दक्षिणेकडील राज्यांमध्ये हत्तींची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. गेल्या वर्षी गर्भवती हत्तीणीचा तोंडात फटाके फुटल्यानं मृत्यू झालेला होता. त्यानंतर आता माणसाच्या क्रूरतेचा कळस असलेली आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. तामिळनाडुतील निलगिरी इथं एका व्यक्तीने पेटती टायर हत्तीवर फेकली होती. यामुळे हत्तीला गंभीर जखम झाली आणि त्यातच हत्तीचा मृत्यू झाला आहे.
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुन्हा एकदा माणुसकी संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. हत्तीवर टायर फेकल्यानंतर ती जळत असलेली टायर अंगावरून पाडण्याचा प्रयत्न हत्ती करताना दिसतो.रात्रीच्या अंधारात हत्ती धावत सुटल्याचंही व्हिडिओमध्ये दिसतं आहे. आगीमुळे गंभीर जखमी झालेल्या हत्तीवर काही दिवस उपचारही सुरु होते. मात्र हत्तीला वाचवण्यात यश आलेलं नाही.
आता या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून अमानुष कृत्य करणाऱ्याला हृदय आहे की नाही असा प्रश्न विचारला जात आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पेटलेली टायर हत्तीच्या कानात अडकल्याचं दिसतं. तसंच आगही काही वेळात भडकते आणि हत्ती इकडे तिकडे धावत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. क्रूरतेचा कळस पाहून प्रतिक्रिया देणाऱ्या लोकांनी म्हटलं की ज्यांच्यातली माणुसकी संपली आहे ते असं काम करतात. अनेकांनी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल राग व्यक्त केलेला आहे.
वाचा- देशासाठी चार राजधानी पाहिजेत : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी
Post Views:
26