Views:
18
मुंबई – मराठमोळा अभिनेता आरोह वेलणकर ‘बाबा’ झाला आहे. मंगळवारी इंस्टाग्रामवरून त्याने ही गोड बातमी चाहत्यांना दिली. It’s A Boy असं लिहिलेला एक सुंदर फोटो आरोहने शेअर केला असून त्यावर Yaasss असं कॅप्शन लिहिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहत्यांसह अनेक कलाकारांनीदेखील शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये स्पृहा जोशी, सुयश टिळक, गौरी नलावडे अशा बऱ्याच मराठी कलाकारांचा समावेश आहे.
आरोहने या अगोदर आपल्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचे फोटो शेअर केले होते. या फोटोला ‘आता फक्त दोनच महिने उरले’ असं कॅप्शन त्याने दिलं होतं. दरम्यान, आरोह वेलणकर सध्या ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. या मालिकेत मिताली मयेकर त्याची सहकलाकार आहे. आरोहने ‘रेगे’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. ‘रेगे’ हा चित्रपट तुफान गाजला होता.