वाचा :-लग्नासाठी अलिबागला जात असताना अभिनेता वरुण धवनच्या गाडीला अपघात
काही दिवसांपूर्वीच मिताली आणि सिद्धार्थने त्यांच्या हळद आणि मेहंदी सोहळ्याचे फोटो इन्स्टाग्रामवरून शेअर केले होते. त्यानंतर आता त्यांचा संगीत सोहळा पार पडला आहे. सिद्धार्थ-मितालीच्या काही मित्र-मैत्रिणींनी या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. तर यापूर्वी सिद्धार्थ-मितालीने त्यांचे केळवण, ग्रहमख, हळद, मेहंदी या कार्यक्रमांचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. अखेर ही जोडी येत्या काही दिवसांत लग्नबंधनात बांधली जाणार आहे.
Post Views:
66