बायडेन राष्ट्रपती झाल्यानंतर अमेरिकन बाजारपेठेत चांगली तेजी आल्यामुळे भारतीय बाजारही त्याचा चांगला परिणाम दिसून आला. सेन्सेक्स पॅकमध्ये आज बजाज फायनान्स, बजाज फिनझर्व्ह, एचसीएल टेक, बजाज ऑटो, टायटन, आरआयएल, टेक महिंद्रा, कोटक बँक, इंडसइंड बँक, एशियन पेंट, अॅक्सिस बँक आणि डॉ. रेड्डी यांच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली. यांचे शेअर 2.61 टक्क्यांपर्यंत वाढले. तर दुसरीकडे टीसीएस, एचडीएफसी, एचडीएफसी बँक आणि नेस्ले यांच्या शेअरमध्ये 0.33 टक्क्यांपर्यंत घसरण झाली.
Post Views:
44