आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा

आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा

दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट १ जुलै २०२४ रोजी मान्यतेसाठी सेन्सॉर बोर्डकडे सबमिट करण्यात आला होता. पण चित्रपटातील कवितांमध्ये शिव्या आणि अश्लीलता असल्याचे मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी मांडले. त्यावेळी त्यांना या कविता नामदेव ढसाळ यांनी लिहिल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी ‘कोण ढसाळ? आम्ही ओळखत नाही’ असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे. त्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला. आता यावर नामदेव ढसाळ यांचे पुतणे डॉ. स्वप्नील ढसाळ आणि पुतणी डॉ. संगिता ढसाळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही पुन्हा एकदा पत्र लिहून कारवाई करणार – डॉ. स्वप्नील ढसाळ

डॉ. स्वप्नील ढसाळ यांना नुकतंच ‘चल हल्ला बोल’ चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने मांडलेल्या मताबद्दल विचारणा करण्यात आली. यावर त्यांनी भाष्य केले. “पद्मश्री नामदेव ढसाळ यांना पद्मश्री देण्याच्या निर्णय मागे यांची कविताच आहे. त्यांनी लिहिलेल्या कविता या अश्लील असू शकत नाही. नामदेव ढसाळ यांची तुलना तुकारामासोबत केली जाते. त्यामुळे तुम्ही तुकारामाचे अपमान करत आहात, असं मला वाटतं”, असे डॉ. स्वप्नील ढसाळ म्हणाले.

“कवितांमधून भरपूर काही गोष्टी लोकांसमोर येणार आहेत. लोकांचा आणि ढसाळांचा विद्रोह त्या कवितेतून दिसून आलेला आहे. संताप सर्वांनाच आहे. सेन्सॉर बोर्डाकडून गेल्या चार महिन्यापासून आम्ही फॉलोअप घेत आहोत. पत्रव्यवहार करून त्यांच्याकडून कुठलाच प्रतिसाद मिळत नाही, ते टाळाटाळ करत आहेत. आम्ही पुन्हा एकदा पत्र लिहून पुढची कारवाई करणार आहे. आमच्याकडं सगळे प्रयत्न करत आहोत आणि ते करत राहू”, असे डॉ. स्वप्नील ढसाळ यांनी म्हटले.

“आंदोलन आणि चर्चा करू. या चित्रपटाला रिलीज करण्याचा प्रयत्न करु. हल्ला हा कार्यालयावर करणार आहे. मात्र दुसरीकडे आम्ही प्रयत्न करू की शांतीने हा प्रश्न सुटला जाईल. यासाठी पत्रव्यवहार देखील आम्ही करु”, असे डॉ. स्वप्नील ढसाळ यांनी सांगितले.

मग हरामखोरसारखा चित्रपट चालतो का?

तसेच नामदेव ढसाळ यांची पुतणी दलित पॅथर केंद्रीय महासचिव डॉ. संगीता ढसाळ यांनी प्रतिक्रिया दिली. “सेन्सॉर बोर्डमध्ये जे नियुक्त केले जातात, ते ज्युरी प्रत्येक भाषेचे असतात. त्यांना त्या भाषेची जाण असते. मात्र हे ज्युरी त्या चित्रपटांकडे कुठल्या दृष्टीने पाहतात. ते म्हणतात की भाषा अश्लील आहे. मग हरामखोर सारखा चित्रपट रिलीज होतो आणि तो चालतो सुद्धा”, असा सवाल डॉ. संगीता ढसाळ यांनी केला.

“मराठी भाषेला ज्यांनी वाकून फोलादी केलं आणि या भाषेला एक वेगळं वळण दिलं. ज्यांनी विश्वकोश बनवलं, त्या नामदेव ढसाळला अश्लील भाषा वापरली असे विचारतात. हा प्रश्न त्यात ज्युरींना विचारला पाहिजे तुम्हाला कोणती भाषा कळते? ज्या खुर्चीवर बसला त्या खुर्चीला न्याय देऊ शकत नाही, तर त्या ज्युरीना काढणं हे गरजेचे आहे. समाजापुढे आपण जे मानतो ते प्रबोधन असतं. हे प्रबोधन करण्याचं तुम्ही थांबवत आहे का? हे सेन्सर बोर्डला आम्हाला विचारायचं आहे”, असेही डॉ. संगीता ढसाळ यांनी म्हटले.

“आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का?”

“काकांच्या कवितेचा शब्दकोश इतका मोठा आहे की ते समजायला विचार श्रेणी लागते. विजय तेंडुलकर यांनी काकांची प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यांना ती भाषा कळली. तेवढी विचारसरणी आपल्या जुरींकडे नाही. भाषा श्रेणी समजायला एक वेगळा अवाका लागतो तोही त्यांच्याकडे नाही. चित्रपटातून कविता काढून त्यांना काही सार्थ होणार नाही. त्यांच्या कविता जगभर प्रसिद्ध आहेत. अनेक भाषांतून ते प्रसिद्ध झाले. आपण आपली जेव्हा संस्कृती दाखवतो. वाघ्या मुरळीचा डान्स याला अश्लील म्हणत असाल तर.. आपण आपल्या संस्कृतीला कितपत ओळखतो, आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का?” असा कटू सवालही डॉ. संगीता ढसाळ यांनी केला.

“महाराष्ट्र मध्ये राहून विविधतेने नटलेलो आहोत. कला संस्कृतीला अश्लील नाव देऊन आपण आपल्या संस्कृतीला अश्लील म्हणतोय. शासन आणि आम्ही याला चांगलाच याचा पाठपुरावा करणार आणि त्याला न्याय मिळवून देणार आहे. बनसोडे सर आणि आम्ही सोबत पत्र व्यवहार केलेला आहे. पेंटरचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्निल ढसाळ आणि मी स्वतः सेन्सर बोर्डशी बोलून पत्रव्यवहार केला आहे. बरेचसे मीटिंग देखील अटेंड केल्या. पँथर हा पँथर आहे. पँथर एक पाऊल मागे घेतो तसं एक पाऊल आम्ही मागेही घेतलं. मात्र आम्हाला उडी उंच मारायची आहे. यासाठी ते पाऊल आम्ही मागे घेतलं. यामुळे समोरच्याने समजून जावं हा एक इशारा मी त्यांना देत आहोत. आम्ही माघार घेत नाही, पाऊल मागे घेतो पण ते पुढे झेप घेण्यासाठी…”, असेही डॉ. संगीता ढसाळ म्हणाल्या.

“त्यांच्या कवितांवर मुले पीएचडी करतात” – डॉ. संगिता ढसाळ

“मला त्या अधिकाऱ्यांची कीव येते. अधिकाऱ्यांना भारताची आणि महाराष्ट्राची संस्कृती माहिती नसेल. ज्यांना पद्मश्री महाराष्ट्र शासनाने घोषित केले. जर ते हे कोण आहेत असं म्हणत असेल तर त्यांचा अभ्यास कमी आहे. त्यांच्याकडून अभ्यास करून घेणे गरजेचे आहे. मला त्यांची दया वाटते की आपले ज्युरी जे बसलेले आहेत, त्यांना पद्मश्री नामदेव ढसाळ कोण आहे हे माहिती नाही. आम्ही पुतणी जरी असलो तरी आम्ही त्यांना नामदेव ढसाळ कधी बोलत नाही, आम्ही त्यांच्या नावाच्या पुढे पद्मश्री लावतो. कारण तो त्यांचा न्याय दिलेला त्यांच्या कवितेचे भूषण आहे आणि ते दाखवून दिलेले आहे. त्यांच्या नावाने मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये त्यांच्या कवितांवर मुले पीएचडी करत आहेत. अजून काही त्यांना सांगायची गरज नाही. कविता काढणारच नाही… या कवितेत कवीचे मनोगत आणि त्यांच्या भावना असतात आणि त्यांनी त्या भावना त्याच्यातून मांडले आहेत”, असेही संगीता ढसाळ यांनी सांगितले.

“एखादा माणूस बोलू शकत नाही. मात्र कवी त्यांच्या भावना कवितेतून व्यक्त करतो. त्यामुळे तो त्याचा हक्क आहे. कोणाचा हक्क हिरावून घेणे हे आपल्या संविधानमध्ये नाही आणि तो तसाच राहणार आपण कोणाची हक्क घ्यायला आलो नाही. आपण त्याला हक्काची जाणीव करून देऊ. त्यांना जाणीव झाली आहे आणि समोरच्याला नसेल तर तेही आम्ही करून देऊ. चल हल्लाबोल या नावामध्ये हल्लाबोल आहे. समजा न्याय मिळत नसेल तर हल्लाबोल करावाच लागेल”, असा इशारा संगीता ढसाळ यांनी दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मल्लखांबाला आवश्यक सोयीसुविधा पुरवा, युवासेनेची शारीरिक शिक्षण विभागाकडे मागणी मल्लखांबाला आवश्यक सोयीसुविधा पुरवा, युवासेनेची शारीरिक शिक्षण विभागाकडे मागणी
विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मल्लखांब स्पर्धेत घवघवीत यश मिळवून देत विद्यापीठाच्या नावलौकिक अधिक उंचावला. मात्र मल्लखांब खेळासाठी आवश्यक सुविधांची आजही वानवा असून...
आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा
वनप्लस ते मोटोरोला पर्यंत! 35,000 रुपयांच्या बजेटमध्ये येतात ‘हे’ प्रीमियम स्मार्टफोन, पाहा लिस्ट
Revolt RV BlazeX इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षेला ग्रहण; यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
पुणे प्रकरण : पीडित तरुणी ओरडली का नाही? गृहराज्यमंत्र्यांचा अजब सवाल