‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे हे नुकतेच महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजला जाऊन आले, यावरून उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोरदार टोला लगावला आहे. ‘मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सन्मान आहे, इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
जमलेल्या माझ्या तमाम मराठी बंधुनो आणि मातांनो, उद्या पेपरला येईल की उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं. त्यामुळे आजपासूनच सुरु करा की गर्व से कहो हम हिंदू है आणि अभिमानाने म्हणा मी मराठी आहे. एक ठिणगी पडली आणि उपऱ्याचं आक्रमन बाजूला केलं ती म्हणजे शिवसेना. शिवजयंती झाली, महाशिवरात्री झाली, गुढीपाढवा येईल व्हाटसअप वर तुम्ही जे मेसेज पाठवतात ते पण मराठीतच केले पाहिजेत, कारण पंतप्रधान म्हटले अमृताशी पैजा जिंके तुम्ही हसताय काय? तुम्ही हसताय त्यामुळे मी पुढचं विसरतोय, असं म्हणत त्यांनी यावेळी हल्लाबोल केला.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला. ‘मला आता गंगेचं पाणी दिलं मला मान आहे सन्मान आहे, इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारायची याला काय अर्थ? कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, काल परवा साहित्य संमेलन झालं, कसलं संमेलन झालं माहिती नही. विशेष म्हणजे अध्यक्ष यांनी जे विचार मांडले त्यावर चर्चा झाली पाहिजे होती. दिशा दाखवणारे भाषण होत. यावर देशात चर्चा झाली पाहिजे. माझे आजोबा जे विचार मांडायचे त्यांचे आणि त्यांचे विचार मिळते जुळते आहेत. आपल्या देशाचे यान मंगळावर गेलं म्हणून आपण फटाके फोडतो पण दुसरीकडे माणसाच्या पत्रिकेत आपण मंगळ शोधतो, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List