मखान्यासह ‘या’ गोष्टींचे करा सेवन, प्रथिनांची कमतरता दूर होताच मिळतील आश्चर्यकारक फायदे

मखान्यासह ‘या’ गोष्टींचे करा सेवन, प्रथिनांची कमतरता दूर होताच मिळतील आश्चर्यकारक फायदे

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात तंदुरुस्त राहणे आणि निरोगी राहणे हे एक आव्हान बनले आहे. तसेच या बदलत्या वातावरणात स्वतःला फिट ठेवणे देखील खूप महत्वाचे आहे. कारण तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी पोषक तत्वांनी समृद्ध आहार घेणे खूप महत्वाचे आहे. प्रथिने हे शरीरासाठी सर्वात महत्वाचे पोषक घटकांपैकी एक आहे, जे स्नायूंना मजबूत देण्यास व हाडांचे आरोग्य सुधारण्यास आणि शरीरात ऊर्जा राखण्यास मदत करतात. मात्र बऱ्याचदा आपण आपल्या आहारात योग्य प्रमाणात प्रथिनांचा समावेश करौ शकत नाही, ज्यामुळे शरीरात त्याची कमतरता निर्माण होते.

तुम्हालाही प्रथिनांच्या कमतरतेवर मत करायची असल्यास तुमच्या डाएटमध्ये मखान्याचा समावेश करा. प्रथिनांसाठी मखाना उत्तम पर्याय असू शकतो. मखान्यामध्ये भरपूर प्रथिने, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे शरीराला अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. पण तुम्हाला माहिती आहे का की जर मखाना काही खास गोष्टींसोबत मिसळून खाल्ला तर त्याचे पोषण आणखी वाढते? प्रथिनांची कमतरता दूर करण्यासाठी मखान्यासोबत कोणते पदार्थ खाऊ शकतात ते जाणून घेऊया.

 

मखानासोबत शेंगदाण्याचे सेवन

जर तुम्हाला तुमचे स्नॅक्स प्रथिनेयुक्त बनवायचे असतील तर मखाना आणि शेंगदाणे एकत्र भाजून खा. शेंगदाण्यामध्ये प्रथिने आणि हेल्दी फॅटचे प्रमाण चांगले असते, जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात तसेच स्नायूंना बळकटी देतात.

मखान्यासह दहीचे सेवन

दही हे प्रथिनांचा एक उत्तम स्रोत मानले जाते. जर तुम्ही दह्यामध्ये मखाना मिक्स करून खाल्ले तर ते केवळ पचनास मदत करत नाही तर चयापचय गतिमान करते. त्याशिवाय त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरते.

दुधासोबत मखाना खा

रात्री झोपण्यापूर्वी दुधासोबत तुम्ही जर मखाना खाल्ल्यास तुमची हाडे मजबूत होतात आणि शरीराला कॅल्शियम आणि प्रथिने या दोन्ही पोषक तत्वांचा पुरवठा होतो. हे स्नायूंच्या बळकटीसाठी देखील मदत करतात आणि झोपेची गुणवत्ता सुधारते.

मखान्यात बदाम आणि अक्रोड मिक्स करा

तुम्ही रोज सकाळी उठल्यावर हेल्दी आणि पौष्टिक नाश्ता करण्यासाठी मखान्यात बदाम आणि आक्रोड नक्कीच मिसळा. या मिश्रणामुळे शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने, ओमेगा-3 फॅट‍ी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात, ज्यामुळे मेंदू तीक्ष्ण होतो आणि हृदयही निरोगी राहते.

मखाना आणि चिया बियाणे

चिया बियांना सुपरफूड म्हटले जाते कारण त्यात प्रथिने, फायबर आणि ओमेगा-3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात. जर तुम्ही चिया बियांमध्ये मखाने खाल्ले तर ते वजन कमी करण्यास मदत करते, पचन सुधारते आणि त्वचेची चमक वाढवते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा
दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चल...
वनप्लस ते मोटोरोला पर्यंत! 35,000 रुपयांच्या बजेटमध्ये येतात ‘हे’ प्रीमियम स्मार्टफोन, पाहा लिस्ट
Revolt RV BlazeX इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षेला ग्रहण; यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
पुणे प्रकरण : पीडित तरुणी ओरडली का नाही? गृहराज्यमंत्र्यांचा अजब सवाल
“पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…” विकी कौशलने मराठीतून सादर केली कविता, राज ठाकरेंबद्दल म्हणाला…