मुंबई-कोकणात तापमानाचा कहर; उष्णतेच्या लाटेने मुंबईकर हैराण

मुंबई-कोकणात तापमानाचा कहर; उष्णतेच्या लाटेने मुंबईकर हैराण

Mumbai Heatwave : दरवर्षी एप्रिलच्या शेवटी किंवा मे महिन्यात जाणवणारा असह्य उकाडा आणि उन्हाच्या झळा फेब्रुवारी महिन्यात मुंबईकरांना जाणवायला लागल्या आहेत. मुंबई आणि कोकणात फेब्रुवारी महिन्यातच उष्णतेची लाट जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईसह कोकणातील तापमान 40 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीसह संपूर्ण कोकण किनारपट्टी परिसरातील तापमानात झपाट्याने वाढ होत आहे. यामुळे मुंबईतील तापमान 35 अंश सेल्सिअसपासून 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. मुंबईत वाढत्या उन्हामुळे सार्वजनिक ठिकाणे ओस पडली आहेत. नागरिकांसोबतच पक्षी आणि प्राण्यांनाही या उष्णतेचा फटका बसत आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्वेकडून जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईसह कोकण किनारपट्टीतील तापमानात वाढ झाली आहे. पण येत्या गुरुवारपासून तापमानात घट होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दादर चौपाटी रिकामी

मुंबईत उन्हाच्या झळांमुळे गजबजलेली ठिकाणेही ओस पडली आहेत. नेहमी गर्दीने फुललेली दादर चौपाटीही उन्हामुळे रिकामी दिसत आहे. या चौपाटीवर मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकसाठी येतात. मात्र, उन्हाचा त्रास टाळण्यासाठी नागरिक आता सकाळी किंवा संध्याकाळीच बाहेर पडण्यास प्राधान्य देत आहेत. पहाटे 9 वाजता दादर परिसरात 27 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर दुपारी या तापमानाचा पारा 35 ते 40 अंश सेल्सिअस इतका नोंदवण्यात आला आहे.

दुपारी 12 ते 3 घराबाहेर पडणं टाळा

वाढत्या तापमानामुळे फक्त नागरिकच नव्हे, तर पक्षी आणि प्राण्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. अनेक पक्षी उष्माघाताने बेशुद्ध पडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. झाडे आणि तलाव आटत असल्याने पाण्यासाठी वन्यजीवांचे हाल होत आहेत. हवामान तज्ज्ञांच्या मते, शहरातील वाढते काँक्रिटीकरण, झपाट्याने बदलणारे हवामान आणि ग्लोबल वॉर्मिंग यामुळे उन्हाळा अधिक तीव्र झाला आहे. नागरिकांनी स्वतःची आणि मुक्या जीवांची काळजी घ्यावी, भरपूर पाणी प्यावे, हलका आहार घ्यावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच दुपारी १२ ते ३ या काळात गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

श्वसन आणि घशाचे आजार

मुंबई शहरासह उपनगरांत वायू प्रदूषणात पुन्हा वाढ झाली आहेत. त्यामुळे काल मुंबईत धुरकट वातावरण तयार झालं होतं. मुंबईतील हवेचा गुणत्ता निर्देशांक काल 155 वर पोहोचला होता. हा निर्देशांक धोकादायक श्रेणीतील समल्या जातो. हवेतील पीएम 10 चं प्रमाण 201 वर गेलेय तर पीएम 2.5 चं प्रमाण हे 60 वर पोहोचलं होतं. त्यामुळे श्वसनाचे आणि घशाचे आजार होण्याची शक्यता दाट आहे. वाढत्या तापमानाचा मुंबईकरांच्या आरोग्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले असताना काल सर्वदूर हवेत धूर पाहायला मिळाला. ज्याने दृष्यमानतेवर अंशता परिणाम होत असल्याचं जाणवतंय. काल मुंबई उपनगरांत तापमानाचा पारा 31 अंशापर्यंत पोहोचला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट? रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट?
Cricket Rohit Sharma: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याचे मुंबईतील घर भाड्याने दिले आहे. 1,298 वर्ग फुटाचा असलेला...
कोण तू रे कोण तू… जेव्हा राज ठाकरे कवितेतून उलगडतात छत्रपती शिवाजी महाराज
परवा बदलापूर, आज पुणे… शिवरायांच्या राज्यात जो न्याय….; स्वारगेट घटनेवर दिग्दर्शक संतापला
अक्रोड की बदाम… मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी जास्त फायदेशीर काय?
मुंबई- कोकणात उन्हाचे चटके; उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल
फक्त कायदे करून महिला सुरक्षित नाही होणार, पुणे बलात्कार प्रकरणी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया
गुजरातच्या अधिपत्याखाली महायुती सरकारचं काम चाललंय, वैभव नाईकांचा हल्लाबोल