ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश घरातून बाहेर पडले त्या घरात या दोघांचा सन्मानपूर्वक गृहप्रवेश होणार आहे.
ढोल ताश्यांच्या गजरात आणि खास पाहुण्यांच्या उपस्थितीत जानकी-ऋषिकेश पुन्हा आपल्या घरी परतणार आहेत. प्रेक्षकांना लवकरच मालिकेत हे कथानक पहायला मिळणार आहे.
हा खास क्षण आणखी खास करण्यासाठी आदेश बांदेकर, सुचित्रा बांदेकर, सारिका नवाथे, अदिती देशपांडे आणि गिरीजा प्रभू यांनी हजेरी लावली आहे.
अभिनेते आदेश बांदेकर यांनी ऋषिकेशला मानाचा फेटा बांधून त्याचा गौरव केलाय. तर अभिनेत्री गिरीजा प्रभू म्हणजेच 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेतील गौरीने ढोल वाजवून जानकी-ऋषिकेशचं स्वागत केलं आहे.
जानकी आणि ऋषिकेशच्या आयुष्यातला हा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. दोघंही या अभुतपूर्व स्वागताने भारावून गेले आहेत. अखेर विजय सत्याचाच होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.
अभिनेते आदेश बांदेकर यांच्यासाठी देखिल हा क्षण अत्यंत महत्त्वाचा आहे. 'घरोघरी मातीच्या चुली' या मालिकेत पाहुण्या कलाकाराच्या रुपात त्यांची एण्ट्री होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List