‘झी मराठी’ वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज
छोट्या पडद्यावरील मालिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतं. या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावरही लोकप्रिय असतात. मात्र टीआरपीच्या शर्यतीत काही मालिकांना तग धरून राहणं शक्य होत नाही. म्हणून या मालिकांना आपला गाशा गुंडाळावा लागतो.
झी मराठी वाहिनीवरील अशीच एक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या वर्षी या वाहिनीने लागोपाठ काही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या होत्या. शिवा, पारू, नवरी मिळे हिटलरला, पुन्हा कर्तव्य आहे, लाखात एक आमचा दादा या मालिकांना प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.
आता याच मालिकांपैकी एक लवकरच बंद होण्याच्या मार्गावर आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचं शूटिंग अखेरच्या टप्प्यात आलं आहे. वर्ष पूर्ण करण्याआधीच ही मालिका बंद होत असल्याने चाहते नाराजी व्यक्त करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List