Ashok Ma.Ma : अनिश आणि भैरवीने केले लग्न, ‘अशोक मा.मां’च्या आयुष्यात मोठे संकट
कलर्स मराठी वाहिनीवरील ‘अशोक मा.मा’ ही मालिका प्रेक्षकांचे विशेष मन जिंकताना दिसते. या मालिकेत अभिनेते अशोक सराफ हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या मालिकेतील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरताना दिसत आहे. आता मालिका एका वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. मुलगा आणि सूनेच्या निधनानंतर अशोक माजगावकर हे तीनही नातवंडांचा सांभाळ करताना दिसत आहे. त्यासाठी त्यांची नोकरीमध्ये सुरु असलेली धडपड दाखवण्यात आली आहे. दरम्यान, मुलांची मावशी भैरवी सतत काही ना काही नवे डाव आखताना दिसत आहे.
‘अशोक मा.मा’ मालिकेत भैरवीचे नवे प्लॅन आणि कुरघोड्या सुरूच आहेत. त्यात अनिश आणि भैरवीने अचानक लग्न केल्याने मामांना मोठा धक्का बसला आहे. भैरवीच्या हेतूंबद्दल आधीच त्यांच्या मनात संशय होता. त्यात आता या लग्नामुळे घरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. अशोक मामा आधीच अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना, हे नवीन वादळ त्यांच्यासाठी अजून एक मोठं संकट ठरणार असे चित्र दिसत आहे.
अशोक मामा यांचा मित्र परशूरामाने काही दिवसांपूर्वीच भैरवीविषयी संशय व्यक्त केला होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाला आहे. फुलराणीने परशुराम आणि भैरवीचे फोटो काढून त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवले होते. त्याच वेळी संयमीने घरात खोटं बोलून विश्वासघात केल्याचंही उघड झालं. पण या सगळ्याचा कळस म्हणजे अनिशने भैरवीसोबत लग्न करून आल्याची बातमी असणारा आहे. मामांनी आधीच घर विकण्याचा विचार सुरू केला होता, आणि आता भैरवी घरात आली, तर परिस्थिती अजूनच बिघडण्याची शक्यता आहे. भैरवीच्या उपस्थितीमुळे कुटुंबात फूट पडणार का? अनिशच्या या निर्णयाने तो स्वतः अडचणीत सापडणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
अशोर मा.मा आता भैरवी आणि अनिशला घरात घेणार का? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. अनिशच्या निर्णयामुळे परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. त्याच्या प्रेमाचा आणि विश्वासाचा फायदा घेत भैरवी कुटुंबावर वर्चस्व मिळवणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या रविवारी होणाऱ्या महाएपिसोडमध्ये मिळणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List