स्वारगेट बलात्कार प्रकरण – नराधम दत्तात्रय गाडेला पकडा, 1 लाख मिळवा! पुणे पोलिसांकडून फरार घोषित

स्वारगेट बलात्कार प्रकरण – नराधम दत्तात्रय गाडेला पकडा, 1 लाख मिळवा! पुणे पोलिसांकडून फरार घोषित

पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये शिवशाही बसमध्ये 26 वर्षाच्या तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना बुधवारी समोर आली. मंगळवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. दत्तात्रय गाडे असे आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांनी त्याला फरार घोषित केले असून त्याची माहिती देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. विशेष म्हणजे मिंधे गटाचे नेते तानाजी सावंत यांच्या मुलाचे थायलंडला जाणारे विमान तासाभरात हवेतल्या हवेत वळवणाऱ्या पोलिसांचे हात 48 तास उलटून गेल्यानंतरही नराधम गाडेपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

स्वारगेट बस स्थानकावर उभ्या शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याने पीडित तरुणीवर दोनदा बलात्कार केल्याचे वैद्यकीय चाचणीतून समोर आले आहे. आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून जामिनावर बाहेर आला होता. स्वारगेटमध्ये तरुणीवर बलात्कार केल्यापासून तो गायब असून पोलिसांनी फरार घोषित केले आहे. पुणे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली.

दत्तात्रय गाडे याचा पुणे पोलिसांच्या 13 पथकांकडून शोध सुरू आहे. त्याच्या शोधासाठी रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर पथके तैनात करण्यात आली आहेत. बुधवारी त्याचा कुटुंबीयांची आणि प्रेयसीचीही चौकशी करण्यात आली. त्याची माहिती देणाऱ्यास 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे, असे पोलीस उपायुक्त स्मार्थना पाटील यांनी सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश...
‘झी मराठी’ वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज
‘या’ अभिनेत्रीमुळे देशात वाढली होती कंडोमची विक्री, बदलला लोकांचा दृष्टिकोन
रणबीरला ‘रेड फ्लॅग, वुमनायजर’ म्हणणाऱ्यांसाठी चाहतीची पोस्ट; आलियानेही दिली प्रतिक्रिया
Ashok Ma.Ma : अनिश आणि भैरवीने केले लग्न, ‘अशोक मा.मां’च्या आयुष्यात मोठे संकट
महाबळेश्वरवरील पाण्याचे संकट तात्पुरते टळले, 15 कोटींच्या थकबाकीपैकी पालिकेने 1 कोटी 37 लाख भरले
एलबीटी विभागाला टाळे ठोका, राज्यशासनाचे महापालिकेला आदेश; हजारो कोटींच्या वसुलीबाबत प्रश्नचिन्ह