Nagar crime news – पत्नीबरोबरच्या वादातून पतीने स्वतःवर झाडली गोळी

Nagar crime news – पत्नीबरोबरच्या वादातून पतीने स्वतःवर झाडली गोळी

पत्नीबरोबर झालेल्या किरकोळ वादातून पतीने गावठी कट्ट्यातून स्वतःवर गोळी झाडून घेतली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणास उपचारासाठी पुणे येथे हलविण्यात आले आहे. राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे बुधवारी दुपारी ही घटना घडली.

सोमनाथ रामभाऊ वाकचौरे (वय – 32) हा कोपरगाव तालुक्यातील जवळके येथील रहिवासी आहे. सोमनाथ वाकचौरे याचे त्याच्या पत्नीशी नेहमीच वाद होत असल्याने त्याची पत्नी काही दिवसांपासून राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथे माहेरी राहत आहे. मंगळवारी सोमनाथ चिंचोली फाटा येथे आला होता. यावेळी सोमनाथचा पत्नीशी वाद झाल्याने बुधवारी सकाळी पत्नीने सोमनाथविरोधात राहुरी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानंतर पती सोमनाथ वाकचौरे याने दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चिंचोली फाटा येथील भंडारदरा उजव्या कालव्यालगत गावठी कट्ट्यातून स्वतःच्या हनुवटीखाली गोळी झाडून घेतली.

गोळीबाराच्या आवाजाने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेत सोमनाथ गंभीर जखमी झाला. या घटनेची खबर मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमोल पवार, तुळशीदास गिते, सोमनाथ जायभाय, सतीश आवारे, राहुल यादव, अंकुश भोसले यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी गावठी कट्टा जप्त करून जखमी सोमनाथ वाकचौरे याला लोणी येथील रुग्णालयात दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने सोमनाथला उपचारासाठी पुणे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेबाबत सायंकाळी उशिरापर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश...
‘झी मराठी’ वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज
‘या’ अभिनेत्रीमुळे देशात वाढली होती कंडोमची विक्री, बदलला लोकांचा दृष्टिकोन
रणबीरला ‘रेड फ्लॅग, वुमनायजर’ म्हणणाऱ्यांसाठी चाहतीची पोस्ट; आलियानेही दिली प्रतिक्रिया
Ashok Ma.Ma : अनिश आणि भैरवीने केले लग्न, ‘अशोक मा.मां’च्या आयुष्यात मोठे संकट
महाबळेश्वरवरील पाण्याचे संकट तात्पुरते टळले, 15 कोटींच्या थकबाकीपैकी पालिकेने 1 कोटी 37 लाख भरले
एलबीटी विभागाला टाळे ठोका, राज्यशासनाचे महापालिकेला आदेश; हजारो कोटींच्या वसुलीबाबत प्रश्नचिन्ह