चीनची नवी चाल; म्यानमार सीमेजवळ अत्याधुनिक रडार केले तैनात, देशाच्या सुरक्षेला मोठा धोका

चीनची नवी चाल; म्यानमार सीमेजवळ अत्याधुनिक रडार केले तैनात, देशाच्या सुरक्षेला मोठा धोका

चीन एका बाजूला हिंदुस्थानसोबतचे संबंध सुधारण्यासाठीचे प्रयत्न सुरू असल्याचे दाखवते तर दुसऱ्या बाजूला सीमेवर छुप्या पद्धतीने हालचाली सुरू ठेवते. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला असून आता चीनने म्यानमार सीमेजवळील नैऋत्य युनान प्रांतात एक अत्याधुनिक रडार प्रणाली स्थापित केल्याचं वृत्त आहे. या अत्याधुनिक रडारमुळे हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र कार्यक्रम आणि राष्ट्रीय सुरक्षेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इंग्रजी वृत्त संकेतस्थळांना मिळालेल्या माहितीनुसार लार्ज फेज्ड अ‍ॅरे रडार (LPAR) ची पाळत ठेवण्याची श्रेणी 5,000 किलोमीटरपेक्षा जास्त आहे, ज्यामुळे बीजिंगला हिंद महासागराच्या विस्तृत क्षेत्रांवर आणि हिंदुस्थानच्या हद्दीतील अगदी अंतर्गत भागातील हालचाली टिपता येईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. इंडिया टुडे टीव्हीने सूत्रांच्या हवाल्यानं वृत्त दिलं आहे की या रडार प्रणालीमुळे गुप्तचर माहिती गोळा करण्या चीनच्या क्षमतांमध्ये वाढ होऊ शकते. हिंदुस्थानच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमावर लक्ष्य ठेवण्याचा प्रयत्नही या माध्यमातून चीन करू इच्छित आहे.

LPAR प्रणाली रिअल टाइममध्ये बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपण शोधण्याची आणि ट्रॅक करण्याची क्षमता ठेवते. यामुळे चीन हिंदुस्थानच्या पूर्व किनाऱ्यावरील डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटासारख्या प्रमुख ठिकाणांवरून होणाऱ्या हिंदुस्थानच्या क्षेपणास्त्र चाचण्यांवर बारीक लक्ष ठेवू शकते.

अग्नि-5 आणि के-4 सारख्या प्रगत बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसाठी ही ठिकाणे महत्त्वपूर्ण स्थळे आहेत. क्षेपणास्त्रांचा मार्ग, वेग आणि अंतरांवरील महत्त्वाचा डेटा मिळवून, चीनने स्वत:ची संरक्षण यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी उचलेलं हे धोरणात्मक पाऊल आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, ‘माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील’, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, ‘माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील’, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून हिंदी कलाविश्वात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियामणीने 2017 मध्ये लग्न केलं. इव्हेंट मॅनेजर आणि दिग्दर्शक...
सेन्सार बोर्डा, तुला काय कळणार आमच्या व्यथा? काय पुसतो, कोण नामदेव ढसाळ? विद्रोहाच्या मशाली अजून भकभकणार
“तिच्यापासून दूर राहणं पुरुषासाठी कठीण..”; असं कोणाबद्दल बोलला गोविंदा?
“सुनिताची फसवणूक केली तर..”; आईने गोविंदाला आधीच दिली होती वॉर्निंग
“माझ्या कुंडलीत 2 लग्न, सुनीताने यासाठी तयार रहावं…” दुसऱ्या लग्नाबद्दल गोविंदाने स्वत:च सांगितलं होतं
झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी चोरल्या 11 रिक्षा, दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल
मोखाड्यात अधिकाऱ्यांना पाझर फुटला, तहानलेल्या गावांत टँकर पोहोचले, अनेक गावपाड्यांना दिलासा