मुंबई आणि ठाण्यात म्हाडा वृद्धाश्रम उभारणार

मुंबई आणि ठाण्यात म्हाडा वृद्धाश्रम उभारणार

सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणारे म्हाडा आता वृद्धांसाठी अद्ययावत सुविधा असणारे वृद्धाश्रम बांधणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि ठाण्यात वृद्धाश्रम बांधण्यात येणार असून या प्रकल्पाचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे. म्हाडाच्या या निर्णयामुळे गरजू आणि निराधार वृद्धांना हक्काचा आधार मिळणार आहे.

म्हाडाने एमएमआर ग्रोथ हब या प्रकल्पांतर्गत वृद्धाश्रम बांधण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून म्हाडाचे मुंबई मंडळ आणि कोकण मंडळ वृद्धाश्रम उभारण्याची तयारी करीत आहे. मुंबईत अंधेरीतील आराम नगर येथे तर ठाण्यात माजीवाडय़ातील विवेकानंद नगरात अद्ययावत वृद्धाश्रम उभारण्याचे प्रस्तावित आहे. याशिवाय भविष्यात पुणे, नागपूर, नाशिक मंडळातर्फेदेखील वृद्धाश्रम उभारण्यात येणार आहे. याचे नियोजन अंतिम टप्प्यात असून वृद्धाश्रमात काय सोयीसुविधा असाव्यात या सर्व बाबींचा विचार करून रुपरेखा निश्चित केली जाईल.

नोकरदार महिलांसाठी वसतिगृहे

वृद्धाश्रमासह नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईत येणाऱया महिलांच्या सोयीसाठी वसतिगृहे उभारण्याचेदेखील म्हाडाचे नियोजन आहे. मुंबई उपनगरात दहा वसतिगृहे उभारण्यात येणार असून जागेचा शोध सुरू आहे. तर ठाण्यातील माजीवाडा येथे महिलांसाठी एक वसतिगृह उभारण्याचे प्रस्तावित असून या वसतिगृहात एकाचवेळी 200 महिलांच्या निवासाची व्यवस्था होणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रम्प यांच्या धमकीनंतर झेलेन्स्की अमेरिकेला भेट देणार, रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार? ट्रम्प यांच्या धमकीनंतर झेलेन्स्की अमेरिकेला भेट देणार, रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे येत्या शुक्रवारी अमेरिकेला भेट देणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी कॅबिनेट बैठक घेतली....
एसटीचा स्वारगेट डेपो गर्दुल्ले, गुंडांचे आगार, पोलीस, एसटी प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
पुण्यात ‘निर्भया’कांड; स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, अवघा महाराष्ट्र सुन्न, शिंदे–फडणवीसांच्या लाडक्या बहिणी असुरक्षित
जम्मू–कश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला
मुंबई आणि ठाण्यात म्हाडा वृद्धाश्रम उभारणार
मराठी पदव्युत्तर कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द, ठाणे पालिकेचा तुघलकी फतवा
भुमरे, तानाजी सावंत, सत्तार, राठोड यांचे ओएसडी ‘फिक्सर’, मित्रपक्षाचाच आरोप