मराठी भाषा दिनाचा आज भव्य सोहळा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

मराठी भाषा दिनाचा आज भव्य सोहळा, उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार

मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी संस्कृतीच्या उद्धारासाठी अखंडपणे झटणाऱया शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून उद्या गुरुवार, 27 फेब्रुवारी रोजी भव्य मराठी भाषा दिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. न्यू मरीन लाइन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सायंकाळी 5 ते रात्री 9 या वेळेत आयोजित केलेल्या या सांस्कृतिक सोहळय़ात मराठीचा जागर केला जाणार आहे. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. शिवसेनेच्या अखंड पाठपुराव्यानंतर मराठी भाषेला ‘अभिजात’ दर्जा मिळाल्यानंतर हा सोहळा होत असल्यामुळे आकर्षण वाढले आहे.

  • या सोहळय़ानिमित्त ‘स्वर मैफिल’चे परेश दाभोलकर प्रस्तुत ‘बोल मराठी, ताल मराठी’ हा मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम सादर होणार आहे. शिवाय सोहळय़ाच्या निमित्ताने संपूर्ण मरीन लाइन्स परिसर डौलाने फडकणाऱया झेंडय़ांमुळे भगवामय होणार असून माय मराठीच्या गौरवाच्या घोषणांनी दुमदुमणार आहे.
  • शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याने शिवसेनेने यासाठी केलेला पाठपुरावा, मराठी भाषा संवर्धनासाठी लोकाधिकार महासंघाची भूमिका आणि भविष्यातील लढाई याविषयी कार्यक्रमात ऊहापोह करण्यात येणार असल्याची माहिती स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडून देण्यात आली.

कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिवस’ म्हणून जगभरात साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर शिवसेनाप्रणीत स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाकडूनही दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी मराठी भाषा दिनानिमित्त भव्य सोहळय़ाचे आयोजन करण्यात येत आहे. या ‘मराठी भाषा गौरव दिन’ कार्यक्रमाला शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचीही प्रमुख उपस्थिती राहणार असून शिवसेना नेते, सचिव, उपनेते, खासदार, आमदार, विभागप्रमुख, विभाग संघटक, माजी नगरसेवक, विविध आस्थापनातील स्थानीय लोकाधिकार समितीचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. मराठी भाषा दिवस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष शिवसेना नेते-खासदार अनिल देसाई, सरचिटणीस प्रदीप मयेकर, कार्याध्यक्ष विलास पोतनीस, आमदार सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महासंघाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. कार्यक्रमात लोकाधिकार समितीच्या पदाधिकाऱयांनी, कार्यकर्त्यांनी आणि मराठी रसिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ – बिर्ला मातोश्री सभागृह, न्यू मरीन लाइन्स
वेळ – सायंकाळी 5 ते रात्री 9 पर्यंत

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रम्प यांच्या धमकीनंतर झेलेन्स्की अमेरिकेला भेट देणार, रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार? ट्रम्प यांच्या धमकीनंतर झेलेन्स्की अमेरिकेला भेट देणार, रशिया-युक्रेन युद्धावर तोडगा निघणार?
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की हे येत्या शुक्रवारी अमेरिकेला भेट देणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी कॅबिनेट बैठक घेतली....
एसटीचा स्वारगेट डेपो गर्दुल्ले, गुंडांचे आगार, पोलीस, एसटी प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष
पुण्यात ‘निर्भया’कांड; स्वारगेट डेपोत शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार, अवघा महाराष्ट्र सुन्न, शिंदे–फडणवीसांच्या लाडक्या बहिणी असुरक्षित
जम्मू–कश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला
मुंबई आणि ठाण्यात म्हाडा वृद्धाश्रम उभारणार
मराठी पदव्युत्तर कर्मचाऱ्यांचा प्रोत्साहन भत्ता रद्द, ठाणे पालिकेचा तुघलकी फतवा
भुमरे, तानाजी सावंत, सत्तार, राठोड यांचे ओएसडी ‘फिक्सर’, मित्रपक्षाचाच आरोप