ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना, परिवहनमंत्र्यांची घोषणा

ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी निवृत्ती सन्मान योजना, परिवहनमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रात नऊ ते दहा लाख ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी आहेत. या असंघटित क्षेत्रातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना सामाजिक सुरक्षा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा, मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे महामंडळ महाराष्ट्रातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी एक आदर्श संस्था म्हणून कार्य करेल अशा विश्वास राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. या कल्याणकारी महामंडळाच्या पहिल्या बैठकीत बोलत होते. या मंडळाच्या माध्यमातून लाखो रिक्षा आणि ऑटो चालकांसाठी भविष्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येणार आहेत.

नोंदणीसाठी संकेत स्थळ

राज्यभरातील सर्व रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना ५००/- रुपये नोंदणी शुल्क आणि ३००/- रुपये वार्षिक वर्गणी भरून या मंडळाचे सदस्य होता येईल. मंडळाचे सभासद नोंदणीसाठी संकेत स्थळ (वेबसाईट) निर्माण करण्यात आले आहे. या संकेतस्थळावरून अतिशय सुलभ पद्धतीने चालकांना सभासद नोंदणी करता येईल. ( स्वतः च्या मोबाईल वरून देखील त्यांना ते सहज शक्य होईल)

निवृत्ती सन्मान योजनेअंतर्गत ६५ वर्षावरील सभासद ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना प्रत्येकी १० हजार रुपये ‘सन्मान निधी’ दिला जाणार आहे. त्यासाठी आवश्यक त्या अटी आणि शर्ती त्यांनी पूर्ण करणे अपेक्षित आहे.या बरोबरच कल्याणकारी मंडळाच्या सभासद चालकांना जीवन विमा, अपंग विमा अशा आरोग्य योजना राबविणे विचाराधीन आहेत. तसेच त्यांच्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना देखील राबवली जाणार आहे.कर्तव्यवर असताना एखादा चालकात दुखापत झाल्यास त्याला या कल्याणकारी मंडळाच्या माध्यमातून अर्थसहाय्य केले जाणार आहे.

उत्कृष्ट चालक बक्षीस योजना

उत्कृष्ट रिक्षा/टॅक्सी चालक, उत्कृष्ट रिक्षा /टॅक्सी चालक संघटना तसेच उत्कृष्ट रिक्षा स्टॅन्ड यांच्यासाठी आकर्षक बक्षीस योजना दरवर्षी राबवली जाईल, असे परिवहनमंत्री सरनाईक यांनी यावेळी सांगितले. या बैठकीला परिवहन आयुक्त विवेक भीमनराव यांच्या इतर अधिकारी उपस्थित होते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा
दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चल...
वनप्लस ते मोटोरोला पर्यंत! 35,000 रुपयांच्या बजेटमध्ये येतात ‘हे’ प्रीमियम स्मार्टफोन, पाहा लिस्ट
Revolt RV BlazeX इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षेला ग्रहण; यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
पुणे प्रकरण : पीडित तरुणी ओरडली का नाही? गृहराज्यमंत्र्यांचा अजब सवाल
“पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…” विकी कौशलने मराठीतून सादर केली कविता, राज ठाकरेंबद्दल म्हणाला…