‘प्रामाणिकपणाने सांगतो, शब्द जरा जपून वापरा…’, जितेंद्र आव्हाड यांचा संजय राऊत यांना थेट इशारा

‘प्रामाणिकपणाने सांगतो, शब्द जरा जपून वापरा…’, जितेंद्र आव्हाड यांचा संजय राऊत यांना थेट इशारा

महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात वाद सुरु झाला आहे. त्या वादाला कारण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते शिवसेना नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला पुरस्कार आहे. शरद पवार यांनी शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने गौरव केला. यावेळी शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक केल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला मिरच्या झोंबल्या होत्या. संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. त्याला आता जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिले आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, प्रामाणिकपणाने सांगतो शब्द जरा जपून वापरा, हे विश्वासघातकी वगैरे आम्ही ऐकून घेणार नाही. पण जेव्हा लढायची वेळ येईल त्यावेळी तुमच्यापेक्षा जास्त आक्रमक शरद पवार साहेब असतील, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

जितेंद्र आव्हाड खासदार संजय राऊत यांना फटकारताना म्हणाले, पवार साहेबांची उंची, महाराष्ट्रातील देशातील त्यांचे राजकारणातील स्थान अतुलनीय आहे. शरद पवार या देशात असे राजकारणी आहेत की त्यांच्या मनात सूड, द्वेष कधीच निर्माण होत नाही. ते असे का वागतात? याबद्दल आम्हाला ही कधी, कधी राग येतो. पण त्यांच्या मनाचा हा मोठेपणा आहे.

त्यांच्यासोबत स्टेज शेअर केला…

ज्या माणसाने पवार साहेबांना राजकारणात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पक्ष, निशाणी पळवली सर्व केले पण त्यांच्यासोबत स्टेज शेअर करताना त्यांच्या मनात आसूड आणि चिड दिसत नाही, हे खरं तर महाराष्ट्रातील राजकारण्यांनी शिकण्यासारखं आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांचे नाव न घेता सांगितले.

खोट्या पोलीस केस करुन टाक आता, खोटे गुन्हे करुन टाक आता, त्यांचे राजकीय आयुष्य बरबाद करण्यासाठी काम कर, निधी बंद करुन टाक हे जे सुरु झाले ना ते पवार साहेबांना स्पर्श सुद्धा करत नाही. यामुळे पवार साहेब कुठल्या व्यासपीठावर जातात त्याचा कोणी विचारही करू नये, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले.

आपण सर्व एकमेकांना भेटत असतो. एकनाथ शिंदे मला अपॉइंटमेंट देत नाही ती गोष्ट वेगळी. अजित पवार मला केबिनमध्येच घेणार नाही. हे मला माहीत आहे. एकनाथ शिंदे भेटल्यावर एकच सांगतात की परवा भेटू, पण त्यांचा परवा कधीच येत नाही, हे अडीच तीन वर्षात मी पाहिले आहे, असे आव्हाड यांनी म्हटले.

संजय दीना पाटील हे मूळ आमचे व्यक्त होते. ते गेला शिवसेनेत गेले, पण पवार साहेबांनी कधी त्यांच्यावर राग नाही ठेवला. ते अजूनही पवार साहेबांना येऊन भेटतात. पण पवार साहेब कधी त्यांच्याडे डोळे मोठे करत नाहीत, यालाच राजकारण म्हणतात. राजकीय संवाद वाढायलाच हवे. मात्र ते वाढत नाही हे दुर्दैव, तुम्ही तर विरोधकांची चटणीच करायला घेतली आहे, असा टोला संजय राऊत यांना जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा आपली संस्कृती आपल्याला माहित नाही का? नामदेव ढसाळ यांच्या कुटुबियांचा सेन्सॉरच्या ज्युरींना सवाल, आंदोलनाचा इशारा
दलित पँथर आणि युवा क्रांती दल या चळवळींवर आधारित चल हल्ला बोल हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘चल...
वनप्लस ते मोटोरोला पर्यंत! 35,000 रुपयांच्या बजेटमध्ये येतात ‘हे’ प्रीमियम स्मार्टफोन, पाहा लिस्ट
Revolt RV BlazeX इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
पुणे जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये ग्राम सुरक्षेला ग्रहण; यंत्रणा पुन्हा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी
‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
पुणे प्रकरण : पीडित तरुणी ओरडली का नाही? गृहराज्यमंत्र्यांचा अजब सवाल
“पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…” विकी कौशलने मराठीतून सादर केली कविता, राज ठाकरेंबद्दल म्हणाला…