A.R.Rahman : तोंड बंद… ए.आर.रहमानचे रणवीर अलाहबादियावर टीकास्त्र, विकी कौशलही थक्क

A.R.Rahman : तोंड बंद… ए.आर.रहमानचे रणवीर अलाहबादियावर टीकास्त्र, विकी कौशलही थक्क

प्रख्यात संगीतदिग्दर्शक ए.आर.रहमान हे कॉन्ट्रोव्हर्सीपासून नेहमी दूर असतात. ना ते एखाद्या वादात अडकतात ना कोणत्याही वादावर कमेंट करतात. पण मुंबईत नुकताच ‘छावा’ चित्रपटाचा म्यूझिक आल्बम लाँच सोहळा पार पडला, तेव्हा देशातील हे सर्वात प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक एक विधान करण्यापासून स्वत:ला थांबवू शकले नाहीत आणि त्यांनी कोणाचंही नाव न घेता समय रैना आणि रणवीर अलाहबादियावर चांगलीच टीका केली. त्यांचा तो शालजोडीतला आहेर ( टोमणा) ,ऐकून विकी कौशलच नव्हे तर या सोहळ्यासाठी आलेले लोकही खोखो हसू लागaले.

समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमात आलेल्या रणवीर अहलाबादियाने आई-वडिलांवरून एक कमेंट करत प्रश्न विचारला होता, ज्यामुळे संपूर्ण देशात गदारोळ झाला. अनेकांनी त्यावर टीकरा केली, दिग्गज कलाकारांनी सुद्धा त्यावर नाराजी वर्तवली होती. या सगळ्या प्रकरणानंतर रणवीरने एका व्हिडीओद्वारे माफीही मागितली होती. मात्र अजूनही हे प्रकरण तापलेलंच असून आता ए.आर. रहमान यांनीदेखील रणवीरवर टीका केली आहे. तोंड उघडलं की काय घडतं हे आपण पाहिलंच आहे, असे म्हणत त्यांनी कोणाचेच नाव न घेता या संपूर्ण प्रकरणावर टिपण्णी केली.

नेमकं काय झालं ?

खरंतर,’छावा’ चित्रपटाच्या म्युझिक अल्बम लाँचच्या वेळी विकी कौशलने एआर रहमान यांना काही प्रश्न विचारले. त्यातील एक प्रश्न असा होता की जर तुम्हाला तुमच्या संगीताचे इमोजीद्वारे वर्णन करायचे असेल तर तुम्ही कोणती इमोजी वापराल? तेव्हा ए.आर.रेहमान म्हणाले की मी माझ्या संगीतासाठी फक्त त्या इमोजीचा वापर करेन, ज्यामध्ये तोंड बंद असलेलं दिसंत. पुढे रेहमान म्हणाले की ” तोंड बंद ठेवणंच योग्य ठरेल. कारण जेव्हा तोंड उघडतो तेव्हा काय होऊ शकतं, हे आपण सर्वांनीच गेल्या आठवड्यात पाहिलं आहे.”

 

एआर रहमान यांचं हे बोलणं ऐकून सर्वजण काही सेकंदांसाठी स्तब्ध झाले आणि मग विकी कौशलसह सगळेच खोखो हसू लागले. ए आर रेहमान म्हणाले की त्यांच्या संगीतासाठी इमोजी वापरायचं असेल तर ते तोंड बंद असलेले तीन इमोजी वापरतील.कोणाचंच नाव न घेता पण बरोब्बर लगावलेल्या या टोल्यावने सर्वांनाच हसू फुटलं. काल रात्री मुंबईत झालेल्या छावाच्या म्युझिक लाँच कार्यक्रमात एआर रहमान यांनी स्वतः छावाची काही गाणी स्टेजवर लाइव्ह सादर केली. त्यांच्या संगीताचे कौतुक करताना विकी कौशल म्हणाला की ए आर रहमाननी आपल्या चित्रपटाचे संगीत तयार करावे हे त्याचे नेहमीच स्वप्न होते आणि हे स्वप्न ‘छावा’च्या माध्यमातून प्रथमच पूर्ण होणार आहे, असेही त्याने नमूद केलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले ‘कितीही डुबक्या मारा गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही’; उद्धव ठाकरे पुन्हा कडाडले
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मराठी भाषा...
पुणे प्रकरण : पीडित तरुणी ओरडली का नाही? गृहराज्यमंत्र्यांचा अजब सवाल
“पाठीवर हात ठेवून नुसतं लढं म्हणा…” विकी कौशलने मराठीतून सादर केली कविता, राज ठाकरेंबद्दल म्हणाला…
मखान्यासह ‘या’ गोष्टींचे करा सेवन, प्रथिनांची कमतरता दूर होताच मिळतील आश्चर्यकारक फायदे
गंगेत कितीही डुबक्या घेतल्या तरी गद्दारीचा शिक्का आणि पाप जाणार नाही; उद्धव ठाकरे यांनी सुनावले
मराठी संपवण्याची इच्छा असणाऱ्यांना मराठी एकजूट दाखवा; उद्धव ठाकरे कडाडले
Inspiring Story – वॉचमनच्या नोकरीने चालत नव्हतं घर, गुलाबाच्या शेतीतून कमावले महिन्याला 50 हजार रुपये