यंदा 11 फुटी गोंडे ठरणार मिरवणुकीचे आकर्षण, गडहिंग्लजच्या काळभैरव देवाची आज पालखी मिरवणूक

यंदा 11 फुटी गोंडे ठरणार मिरवणुकीचे आकर्षण, गडहिंग्लजच्या काळभैरव देवाची आज पालखी मिरवणूक

ग्रामदैवत व सीमा भागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री काळभैरव देवाची यात्रा शक्रवारी (दि. 14) होत आहे. तर उद्या (दि. 13) सायंकाळी गडहिंग्लज शहरात पालखी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर येथील अत्तार कुटुंबीय भाविकांनी तब्बल 11 फुटी तीन गोंडे तयार केले असून हे गोंडे पालखी मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरणार आहेत.

श्री काळभैरव यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक सीमाभागासह सिंधुदुर्ग, गोवा येथील लाखो भाविक दरवर्षी गडहिंग्लजला येतात. यात्रेच्या आदल्या दिवशी सायंकाळी गडहिंग्लज शहरातील श्री काळभैरव मंदिरातून मिरवणुकीने पालखी बड्याचीवाडी गावच्या डोंगरावरील मंदिराकडे रवाना होते. या पालखी मिरवणुकीत मानाच्या सासनकाठ्यांना गोंडे बांधण्याची परंपरा आहे. हे गोंडे तयार करण्याचे काम गडहिंग्लजमधील बुरुड गल्लीतील खुतबुद्दीन अत्तार कुटुंबीय दरवर्षी करतात. हे गोंडे वीस रुपयांपासून ते सहा हजार रुपयांपर्यंत उपलब्ध असतात. यात्रेच्या पार्श्वभूमीवर यंदाही अत्तार कुटुंबीयांनी गोंडे तयार केले असून यावर आता ते अंतिम हात फिरवत आहेत. यावर्षी स्वप्नील चौगुले, नदीवेसचा राजा मंडळ, खंडोबा तालीम मंडळ यांचे अकरा फुटी गोंडे, पालखीचे मानकरी उपराटे परिवार, नरवीर उमाजी नाईक मंडळ यांचे दहा फुटी, गडहिंग्लज अर्बन बँक यांचे पाच फुटी गोंडे यंदाच्या पालखी मिरवणुकीतील आकर्षण ठरणार आहेत.

चार पिढ्यांची परंपरा

श्री काळभैरव यात्रेसाठी गोंडे तयार करणारी गडहिंग्लजमधील अत्तार कुटुंबीयांची आता चौथी पिढी कार्यरत आहे. अत्तार कुटुंबीयांतील खुतबुद्दीन, तौफिक, नियाज, सद्दाम, सर्फराज, अशिफ हे सर्वजण गोंडे मोठ्या भक्तिभावाने तयार करतात. गोंडे तयार करण्याचे काम आता अंतिम टप्प्यात आहे.

पालखी सोहळा व गोंडा बांधण्याची परंपरा

गडहिंग्लजच्या श्री काळभैरव देवाचे मंदिर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील बड्याचीवाडी गावच्या हद्दीतील डोंगर कपारीत आहे. या ठिकाणीच मुख्य यात्रा भरते. यात्रेच्या आदल्या दिवशी गडहिंग्लज शहरातील शिवाजी चौकात असणाऱ्या श्री काळभैरव मंदिरातून सायंकाळी पालखी मिरवणूक निघते. या सोहळ्यासाठी गडहिंग्लजकर हजारो संख्येने उपस्थित असतात. यावेळी पालखीच्या पुढे असणाऱ्या सासनकाठ्यांना भाविकांकडून गोंडे बांधले जातात. हा सोहळा झाल्यानंतर पालखी मिरवणुकीने मानकरी, हक्कदार व पंचांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात डोंगरावरील मंदिराकडे मार्गस्थ होते. दुसऱ्या दिवशी त्याठिकाणी यात्रा संपन्न होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट? रोहित शर्माने भाड्याने दिले मुंबईतील घर, प्रत्येक महिन्याला किती मिळणार रेंट?
Cricket Rohit Sharma: भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार रोहित शर्मा याने त्याचे मुंबईतील घर भाड्याने दिले आहे. 1,298 वर्ग फुटाचा असलेला...
कोण तू रे कोण तू… जेव्हा राज ठाकरे कवितेतून उलगडतात छत्रपती शिवाजी महाराज
परवा बदलापूर, आज पुणे… शिवरायांच्या राज्यात जो न्याय….; स्वारगेट घटनेवर दिग्दर्शक संतापला
अक्रोड की बदाम… मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी जास्त फायदेशीर काय?
मुंबई- कोकणात उन्हाचे चटके; उष्णतेच्या लाटेने नागरिकांचे हाल
फक्त कायदे करून महिला सुरक्षित नाही होणार, पुणे बलात्कार प्रकरणी माजी सरन्यायाधीश चंद्रचूड यांची प्रतिक्रिया
गुजरातच्या अधिपत्याखाली महायुती सरकारचं काम चाललंय, वैभव नाईकांचा हल्लाबोल