I love my Swami..कोण आहे MRS अलाहाबादिया ? रणवीरच्या फोटोला मिठी मारली आणि…
समय रैनाच्या INDIA’S GOT LATENT या शोचे सर्व भाग हटवण्यात आले आहेत. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एपिसोडनंतर हा गोंधळ सुरू झाला. त्या शोमध्ये आलेला यूट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अलाहबादियाच्या एका विधानामुळे चांगलाच गदारोळ माजला आहे. तेथे त्याने एका स्पर्धकाल पालकांवरून असा एक भयानक, अश्लील प्रश्न विचारला की त्यामुळे लोक भयानक भडकले. सोशल मीडियावरही हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आणि रणवीर सह , समय रैनावर तसेच या शो वर चहूबाजूने टीकास्त्र सोडलं, त्यांना ट्रोलही करण्यात आलं. या शोमध्ये पोहोचलेल्या रणवीर, आशिष चंचलानी आणि अपूर्वा मखिजा यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एवढंच नव्हे तर समय रैना देखील वाईटरित्या अडकला आहे. या वादानंतर रणवीर अलाहाबादियाने माफी मागितली असली तरी हे प्रकरण काही थंडावताना दिसत नाहीये. दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. मात्र असं असतानाच आता रणवीरच्या एका महिला चाहतीने त्याच्यालोबत हग डे (HUG DAY) सुद्धा साजरा केला आहे.
बराच प्रसिद्ध YouTuber असलेल्या रणवीर अलाहाबादियाला अनेक जण फॉलो करतात. IGL मधील त्याच्या कमेंटनंतर त्याच फॅन फॉलोईंग घटलं असलं तरीही अनेक लोकांना तो आवडतो. त्यापैकीच एक फॅन म्हणजे रोहिणी आरजू नावाची तरूणी. ती त्याची मोठी चाहती असून ती रणवीरच्या इतकी प्रेमात आहे की तिने याआधी रणवीरसाठी करवा चौथचं व्रत करत उपासही केला होता. त्याच्यावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या या तरूणीने आता व्हॅलेंटाईन डे आणि त्या आधीचेही अनेक दिवस सेलिब्रेट करताना दिसत आहे. एवढंच नव्हे तर आपण मिसेस अलाहाबादिया असल्याचं विधानंही तिने नुकतंच केलं.
स्वत:ला MRS अलाहाबादिया म्हणणारी ही तरूणी कोण ?
स्वतःला मिसेस अलाहाबादिया म्हणवणारी ही मुलगी म्हणजे रोहिणी आरजू , ती स्वतःला रणवीरची मोठी फॅन म्हणवते. तिने स्वतःला त्याची पत्नीही मानले आहे.रोहिणीचे त्याच्यावर एकतर्फी प्रेम आहे आणि तिने रणवीरसाठी करवा चौथचा उपवास देखील केला होता. एवढंच नव्हे तर रोहिणी आरजूने रणवीर अलाहाबादियाचे नावही टूटेने गोंदवलं आहे. रोहिणीच्या खोलीत रणवीर अलाहाबादियाचे अनेक फोटो आहेत. त्याचे फोटो ती बरेचदा शेअर करत असते. नुकतीच तिने रणवीरच्या फोटोला मिठी मारून दाखवली. त्यासोबतच तिने एक लांबलचक कॅप्शनही लिहीली होती.
” मिसेस अलाहाबादिया इकडे आहे. प्रेम हे योग्य आणि अयोग्य, चांगले आणि वाईट या पलीकडे आहे. सामाजिक परिस्थिती, मते, निर्णय, पैसा, संपत्ती, दर्जा, प्रसिद्धी आणि सर्व सांसारिक परिस्थितीच्या पलीकडे प्रेम असतं. जेव्हा ही सर्व लेबल्स नष्ट होतात, तेव्हा जे उरतं ते शुद्ध प्रेम असतं. प्रेम म्हणजे फक्त प्रेम. मी माझ्या स्वामींवर खूप प्रेम करतो. हॅपी हग डे ” असं तिने लिहीलं आहे.
लोकांच्या भन्नाट कमेंट्स
सर्वात शेवटी तिने रणवीरच्या अलाहबादियाच्या नावासोबत नाव जोडून लिहीलं. मात्र त्यावर अनेक यूजर्सनी कमेंट्स केल्या आहेत – रणवीर आधी अडचणीत आहे, त्याला अजून त्रास का देतेस? असं एकाने लिहीलं. तो तर जेलमध्ये जाणारे, हग डे कसा साजरा करशील ? असा खोचक सवाल एकाने विचारला. तर काही लोकांनी तिचं हे वागणं म्हणजे लोकप्रिय होण्याचा मार्ग म्हटले आहे. खरंतर रोहिणी आरजू अशा प्रकारचे फोटो शेअर करून लोकांचे लक्ष वेधून घेते. तिने याआधीही रणवीरचाल उल्लेख तिचा स्वामी असा केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List