तोकडे कपडे घालणे गुन्हा नाही, महिलांची निर्दोष मुक्तता
तोकडे कपडे घालणे गुन्हा नाही, तसेच गाण्यांवर नाचले म्हणून कायद्यात कोणत्याही शिक्षेची तरतूद नाही, असा सांगते दिल्लीतील तीस हजारी कोर्टाने सात महिलांची निर्दो, मुक्तता केली आहे. या महिलांवर गेल्या वर्षी एका बारमध्ये अश्लिल डान्स आणि लोकांना त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला होता. परंतु, डान्सरला तेव्हाच शिक्षा होऊ शकते. जेव्हा एखाद्याच्या डान्समुळे इतरांना त्रास होतो, असे न्यायदंडाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस गस्त घालत असाना बारच्या आतमध्ये महिलांनी तोकडे कपडे घालून अश्लिल डान्स केल्याचे पोलीस उपनिरीक्षकांनी म्हटले होते. परंतु, या डान्समुळे कोणालाही त्रास झाला नाही. पोलिसांनी केलेला दावा मान्य केला तरी तो गुन्हा म्हणून सिद्ध होत नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाने सात महिलांसोबत बारच्या व्यवस्थापकाचीही निर्दोष मुक्तता केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List