पुन्हा वाद पेटला, सरकारी योजनांमुळे आपले कामगार आळशी बनले! एल ऍण्ड टीचे अध्यक्ष सुब्रहमण्यन यांनी डिवचले

पुन्हा वाद पेटला, सरकारी योजनांमुळे आपले कामगार आळशी बनले! एल ऍण्ड टीचे अध्यक्ष सुब्रहमण्यन यांनी डिवचले

रविवारी सुट्टीच्या दिवशी बायकोकडे किती वेळ एकटक पाहत राहणार, त्यापेक्षा बॅग उचला आणि कामाला जा. आठवडय़ाचे 90 तास काम करा, असा अजब सल्ला देणाऱ्या लार्सन अॅण्ड टुब्रोचे अध्यक्ष एस. एन. सुब्रहमण्यन यांनी पुन्हा एकदा कामगारांना डिवचले आहे. सरकारी योजनांचा लाभ मिळत असल्याने आपले कामगार आळशी बनले आहेत. ते बाहेर जाऊन काम करण्यास तयार होत नाहीत, अशी खंत सुब्रहमण्यन यांनी बोलून दाखवली आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा नवा वाद पेटला असून सोशल मीडियातून त्यांना पुन्हा ट्रोल केले जात आहे.

बांधकाम क्षेत्रात मजुरांचे स्थलांतर कमी होत चालले आहे. नोकरीनिमित्त कामगार शहराकडे वळत नसल्याचे चित्र आहे. कारण, सरकार त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणत आहे. अशा योजनांचा लाभ मिळत असल्याने बांधकाम मजूर आरामाला प्राधान्य देतात. कामाच्या शोधात शहराकडे जाण्याचे टाळतात, असे सुब्रहमण्यन यांनी म्हटले आहे.

योजनांचा लाभ थेट खात्यात

आपले गाव आणि शहर सोडून रोजगाराच्या संधीसाठी दुसरीकडे जाण्यास कामगार सहजासहजी तयार होत नाहीत. कामगारांची भरती आणि त्यांना विविध प्रकारच्या सुविधा पुरविण्यासाठी एल अॅण्ड टीकडे स्वतःची एचआर टीम आहे, परंतु असे असतानाही आम्हाला कामगारच मिळत नसल्याचे चित्र आहे. बांधकाम मजुरांची भरती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे सुब्रहमण्यन म्हणाले.

जपानच्या कंपनीत कर्मचाऱ्यांना दारू आणि हँगओव्हरसाठी सुट्टी!

जपानमधील ट्रस्ट रिंग कंपनीने कर्मचाऱयांना खूश करण्यासाठी एक भन्नाट युक्ती आखली आहे. पंपनीने आपल्या कर्मचाऱयांना मोफत दारू देण्याची योजना आणली असून हँगओव्हरसाठी रजादेखील मंजूर करण्यात आली आहे. ओसाकास्थित असलेल्या या कंपनीने कर्मचाऱ्यांना कामाच्या वेळेत मद्यपान करण्याची परवानगी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

11 वर्षांपासून प्रेम प्रकरण, डिसेंबर महिन्यात लग्न…पण त्यापूर्वीच प्रियकाराचे प्रेयसीवर चाकूने अनेक वार 11 वर्षांपासून प्रेम प्रकरण, डिसेंबर महिन्यात लग्न…पण त्यापूर्वीच प्रियकाराचे प्रेयसीवर चाकूने अनेक वार
प्रेम प्रकरणातून हल्ले होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्या आहेत. मुंबईतील विरारमधील प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. 11...
ठाणे महापालिकेचा तो मराठी भाषेबाबतचा जीआर वादात, मनसे आक्रमक, अविनाश जाधव यांचा थेट इशारा
Swargate Crime Updates : स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
मुंबई-कोकणात तापमानाचा कहर; उष्णतेच्या लाटेने मुंबईकर हैराण
Nalasopara Crime News : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! पोटच्या तीन मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार
विकीची टोपी काढली, मग त्याचा टीशर्ट मागितला; विकीसोबत मस्ती करणाऱ्या चिमुकल्याला ओळखलं का? छावामध्ये आहे खास सीन
प्रशासन काय करत आहे?; स्वारगेट अत्याचार प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप