आर्चीशी लग्न करणार का? कृष्णराज महाडिक यांनी अखेर मौन सोडलं, म्हणाले ठरवून…
भाजपा नेते धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक आणि सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू यांचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं. कृष्णराज महाडिक हे रिंकूसोबत लग्न करणार आहेत, अशी देखील चर्चा सुरू झाली. अखेर या फोटोवर प्रतिक्रिया देताना कृष्णराज महाडिक यांनी मोठा खुलासा केला आहे, त्यानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिक यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक फोटो शेअर करण्यात आला होता. या फोटोमध्ये ते रिंकू राजगुरूसोबत दिसत आहेत.’आज अभिनेत्री रिंकू राजगुरू या कोल्हापूरमध्ये आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मातेचे दर्शन घेतले असं कॅप्शन हा फोटो पोस्ट करताना देण्यात आलं होतं. त्यानंतर अवघ्या काही वेळेतच हा फोटो व्हायरल झाला आणि कृष्णराज महाडिक हे रिंकूसोबत लग्न करणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर अखेर कृष्णराज महाडिक यांनी या फोटोबाबत खुलासा केला आहे. त्यानंतर आता या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
नेमकं काय म्हणाले महाडिक
संपूर्ण माहिती खोलात जावू देतो. आर्ची कार्यक्रमासाठी आली होती. आर्ची आणि माझ्या फोटोमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. आर्ची माझी फक्त चांगली मैत्रीण आहे.कदाचित साहेबांच्या वक्तव्यावरून गोंधळ झाला. लग्नाच्याबाबतीत मी काहीही सांगू शकत नाही.माझा चाहता वर्ग खूप मोठा आहे, माझ्या चाहत्यांना सांगतो सर्वांनी संयम ठेवा, आमची ठरवून भेट झालेली होती. आम्ही एकत्र दर्शन घेतलं. मात्र तसं काही नाही. तिच्यासोबत माझी चांगली ओळख आहे, ती माझी फक्त एक चांगली मौत्रीण आहे. लग्नाबाबत काय होणार लवकरचं कळेल, थोडा संयम ठेवा सगळं कळेल अशी प्रतिक्रिया या फोटोवर कृष्णराज महाडिक यांनी दिली आहे. दरम्यान कृष्णराज महाडिक यांच्या या खुलाशानंतर आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. आर्ची आपली फक्त एक मैत्रिण असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List