इंडियाज गॉट लेटेंट वादावर समय रैनाचा मोठा निर्णय; म्हणाला “मला हे आता असह्य होतंय म्हणून मी…”

इंडियाज गॉट लेटेंट वादावर समय रैनाचा मोठा निर्णय; म्हणाला “मला हे आता असह्य होतंय म्हणून मी…”

इंडियाज गॉट लेटेंट शोवरून सुरू असलेल्या वादावरून सध्या शोसंबंधित असलेले सदस्य, ज्याने या शोमध्ये अश्लील वक्तव्य केलं तो रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्याविरुद्ध मुंबईत एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेने ही कारवाई केली आहे. रणवीर आणि समय व्यतिरिक्त, पहिल्या भागापासून आतापर्यंत शोमध्ये सहभागी झालेल्या 30 सदस्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनेक ठिकाणी गुन्हे दाखल

एवढंच नाही तर ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनने गृहमंत्री अमित शाह यांना ‘इंडियाज गॉट लेटेंट’ या शोवर बंदी घालण्यासाठी पत्रही लिहिले आहे. महिला आयोगाने अलाहाबादिया, समय रैना आणि इतरांनाही समन्स पाठवले आहेत. सर्वांना 17 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय महिला आयोगाच्या कार्यालयात बोलावण्यात आले आहे. रणवीर अलाहाबादियाच्याविरुद्ध इंदूरमध्येही तक्रार दाखल करण्यात आली आहे.

समय रैनाचा मोठा निर्णय

तर अशाप्रकारे सर्वच बाजूंनी हा शो, समय, रणवीर आणि या शोमधील इतर सदस्य यासर्वाच्याच अडचणी आता वाढत चालल्या आहेत. या सर्वांची पोलीस चौकशीही सुरु आहे. अशातच आता समय रैनानं या सर्व प्रकरणावर त्याचं स्पष्टीकरण देत इंस्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. त्याने शोचे सर्व व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट केल्याचं त्याच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

नक्की काय म्हणाला समय?

समयने म्हटलं आहे की, “जे काही घडत आहे ते मी हाताळू शकत नाहीये. मला हे सर्व असह्य होत आहे. त्यामुळे मी माझ्या चॅनेलवरून इंडियाज गॉट लेटेंटचे सर्व व्हिडिओ डिलीट केले आहेत. माझा एकमेव उद्देश लोकांना हसवणे आणि त्यांना आनंद देणे हाच होता. मी सर्व एजन्सींना पूर्ण सहकार्य करेन जेणेकरून त्यांना त्यांचा तपास योग्यरित्या करता येईल. धन्यवाद.” असं म्हणत त्याने त्याचे आतापर्यंतचे सर्व व्हिडीओ त्याच्या युट्यूब चॅनलवरून डिलीट केले आहेत.

सर्व व्हिडीओ डिलीट करून टाकणे म्हणजे हा शो बंद करण्यासारखं

यानंतर अजूनतरी इतर सदस्यांची कोणतीही प्रतिक्रिया यावर आलेली नाही. पण सध्याचं संतापलेलं वातावरण पाहाता समयने त्याच्या शोचे सर्व व्हिडीओ डिलीट करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान रणवीर अलाहाबादियानेही या प्रकरणाबाबत माफी मागितली होती. पण तरीही त्यांच्यावरील राग आणि गुन्हे दाखल करणं सुरुच होतं. अनेकांनी शो बंद करण्याची मागणीही केली होती. मात्र आता समयने शोचे सर्व व्हिडीओ डिलीट करून टाकणे म्हणजे हा शो बंद करण्यासारखंच आहे.

समय रैनाच्या या शोच्या प्रत्येक भागाला लाखो व्ह्यूज मिळालेले होते. मात्र आता समयच्या या निर्णयानंतर आता हे प्रकरण शांत होणार की पुढील कारवाई सुरुच राहणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

11 वर्षांपासून प्रेम प्रकरण, डिसेंबर महिन्यात लग्न…पण त्यापूर्वीच प्रियकाराचे प्रेयसीवर चाकूने अनेक वार 11 वर्षांपासून प्रेम प्रकरण, डिसेंबर महिन्यात लग्न…पण त्यापूर्वीच प्रियकाराचे प्रेयसीवर चाकूने अनेक वार
प्रेम प्रकरणातून हल्ले होण्याच्या घटना गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्या आहेत. मुंबईतील विरारमधील प्रेम प्रकरणातून प्रियकराने प्रेयसीवर जीवघेणा हल्ला केला. 11...
ठाणे महापालिकेचा तो मराठी भाषेबाबतचा जीआर वादात, मनसे आक्रमक, अविनाश जाधव यांचा थेट इशारा
Swargate Crime Updates : स्वारगेट अत्याचार प्रकरण : घटनेनंतर आरोपी ऊसाच्या शेतात लपला?
मुंबई-कोकणात तापमानाचा कहर; उष्णतेच्या लाटेने मुंबईकर हैराण
Nalasopara Crime News : बाप-लेकीच्या नात्याला काळिमा! पोटच्या तीन मुलींवर नराधम बापाकडून अत्याचार
विकीची टोपी काढली, मग त्याचा टीशर्ट मागितला; विकीसोबत मस्ती करणाऱ्या चिमुकल्याला ओळखलं का? छावामध्ये आहे खास सीन
प्रशासन काय करत आहे?; स्वारगेट अत्याचार प्रकरणावर मराठी अभिनेत्याचा संताप