इंडियाज गॉट लेटेंट; पोलिसांसमोर अपूर्वा मखिजा, आशिष चंचलानीचा जबाब; शोबद्दल अनेक खुलासे
‘इंडियाज गॉट लॅटेंट’ हा शो सध्या चांगलाच वादात सापडला आहे. त्यात कार्यक्रमात रणवीर अलाहाबादियाने केलेल्या वादग्रस्त वक्वत्यावरून तर हा वाद जास्तच चिघखळत चालला आहे. या शोवरुन रणवीर आणि समय तसेच त्यांच्या शोमधील इतर सदस्यांवरही गुन्हा दाखल झाला आहे. रणवीर आणि समयनंतर अपूर्वा मखिजा, आशिष चंचलानी यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं होतं. पोलीस चौकशीत जबाब नोंदवताना त्यांनी अनेक खुलासे केले आहेत.
अपूर्वा मखिजा, आशिष चंचलानी यांनी पोलिसांना काय सांगितलं?
या प्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी शोशी संबंधित 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. बुधवारी, सायबर पोलिसांनी या शोचा भाग असलेल्या अपूर्व मखिजा यांची सुमारे दोन तास चौकशी केली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपूर्वा मखिजा आणि आशिष चंचलानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की दोघांनीही सांगितलं की सदरचा शो हा स्क्रिप्टेड वगैरे काहीही नव्हता. या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक आणि जजेस हे उत्स्फुर्तपणे त्यांच्या फ्लोमध्ये बोलत गेले होते.
कुठलाही मोबदला किंवा मानधन दिलं जात नाही
या दोघांनी पोलिसांना असंही सांगितलं की इंडियाज गॉट लेटेंट शोमध्ये जे जजेस सहभागी होतात त्यांना कुठलाही मोबदला किंवा मानधन दिलं जात नाही. तसंच जो कंटेट पोस्ट केला जातो तो पोस्ट करण्याचं स्वातंत्र्य त्यांना आहे. त्यामुळे तो कंटेट सोशल मीडियावर पोस्ट केला जातो. तसंच या शोसाठी जी तिकिटे असतात त्या तिकिटांमधूनच जो शोमध्ये जिंकतो त्याला बक्षीस दिलं जातं. असही या दोघांनी जबाबात म्हटलं आहे. अपूर्वा मखिजा आणि रणवीर अलाहबादियाचा मॅनेजर या दोघांचा जबाब खार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे.
हा शो समय रैनाचा आहे…
दरम्यान पुढे शोमध्ये जज म्हणून येणाऱ्या गेस्टला पैसे दिले जातात का? असा प्रश्नही आशिष आणि अपूर्वाला विचारण्यात आला होता.तेव्हा त्यांनी सांगितलं की, इंडियाज गॉट लेटेंट शो हा समय रैनाचा आहे. या शोच्या फॉरमॅटनुसार, प्रत्येक भागात काही लोकांना आमंत्रित केले जाते जे जजची भूमिका बजावतात. आशिष चालानी, अपूर्वा मखीजा आणि रणवीर अलाहाबादिया यांनीही या शोमध्ये जज म्हणून भाग घेतला होता. तसेच जज म्हणून आलेल्या गेस्टला पैसे दिले जात नाहीत असही माहिती समोर आली आहे.
दरम्यान या प्रकरणात आता पुढे आणखी काही जणांची चौकशी होण्याची शक्यता आहे. कारण या शोसोबतच समय, रणवीर आणि अशा 20 ते 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता या प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List