धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे प्रकल्पासाठी निधी वाढवून प्रकल्प पूर्ण करावा, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची लोकसभेत मागणी
धाराशिव – तुळजापूर – सोलापूर या रेल्वे प्रकल्पासाठी 3 हजार कोटी रुपयांचा निधी मागितला होता पण प्रत्यक्षात फक्त 225 कोटी रुपये निधी देण्यात आला आहे अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली. त्यामुळे या प्रकल्पासाठी जास्त निधी देऊन हा प्रकल्प पूर्ण करावा अशी मागणी निंबाळकर यांनी केली आहे.
लोकसभेत ओमप्रकाश राजेनिंबाळकर म्हणाले की, धाराशिव – तुळजापूर – सोलापूर या रेल्वे प्रकल्पासाठी 8 जानेवारी 2019 मध्ये 904 कोटी रुपये च्या खर्चास मान्यता देण्यात आली होती परंतु शासनाकडून या प्रकल्पास आजपर्यंत फक्त 1026 कोटी निधी प्राप्त झाला आहे..!
त्यामुळे या नवीन रेल्वे मार्गासाठी सुधारित निधीची मागणी 3000 कोटीची करण्यात आली आहे असे असताना चालू आर्थिक वर्षात केवळ 225 कोटी रुपये एवढी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे जी के अपुरी स्वरूपात असल्याने सदरील तरतूद वाढवावी व हा नवीन रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करावा अशी मागणी राजेनिंबाळकरांनी लोकसभेत केली.
धाराशिव – तुळजापूर – सोलापूर या रेल्वे प्रकल्पासाठी 8 जानेवारी 2019 मध्ये 904 कोटी रुपये च्या खर्चास मान्यता देण्यात आली होती परंतु शासनाकडून या प्रकल्पास आजपर्यंत फक्त 1026 कोटी निधी प्राप्त झाला आहे..!
त्यामुळे या नवीन रेल्वे मार्गासाठी सुधारित निधीची मागणी 3000 कोटीची… pic.twitter.com/rGruM3Ipqp
— Omprakash Rajenimbalkar (@OmRajenimbalkr) February 12, 2025
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List