VIDEO: अर्जुन कपूर स्टेजवर येताच चाहता मलायकाच्या नावाने ओरडला; पुढे जे घडलं…
बॉलिवूडमध्ये कोणाचं नातं आणि ब्रेकअप चर्चेत आला असेल तर तो अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा आहे. अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा यांच्या ब्रेकअपच्या चर्चा तर आजही तेवढ्याचं प्रखरतेने होतात. सध्या अर्जुन कपूर सिंगल असून तो त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करतोय. अर्जुन त्याचा आगामी चित्रपट ‘मेरे हसबंड की बीवी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान अर्जुनसोबत अजब किस्सा
अर्जुनचा ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात अर्जुनसह अभिनेत्री भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. अर्जुन, भूमी आणि रकुल ठिकठिकाणी प्रमोशन करताना पाहायला मिळतायत. या चित्रपटाचा एका प्रमोशनदरम्यानचा अर्जुनचा कपूरचा एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
अर्जुन आणि चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी एका ठिकाणी गेली होती तेव्हा अर्जुनसोबत एक किस्सा घडला ज्यामुळे तो पुरता वैतागलेला दिसत होता. अर्जुन कपूर स्टेजवर येताच चाहता मलायकाच्या नावाने ओरडू लागला आणि त्यावेळेस अर्जुन कपूरचा चेहरा हा पाहण्यासारखा होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अर्जुनला पाहाताच मलायकाच्या नावाने जोरात ओरडला चाहता
व्हायरल व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर, भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंह ‘मेरे हसबंड की बीवी’ चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहेत. यावेळी रकुल, भूमी दोघी चाहत्यांशी संवाद साधत असताना यावेळी भूमिला कोणीतरी विचारलं की, तिला हा चित्रपट का आवडला आणि करावा वाटला? भूमी काही उत्तर देण्याआधीच अर्जुनला पाहून कोणीतरी जोरजोरात मलायकाच्या नावाने जोरात ओरडतो.
अर्जुनही वैतागला
गर्दीतला हा आवाज अर्जुनलाच नाही, तर सर्वांनाच ऐकू येतो. मात्र, हा आवज येताच अर्जुनही थोडा वैतागलेला दिसला आणि तो नुसताच बघत बसला, पण तो काहीच बोलला नाही. यानंतर रकुल आणि भूमी दोघीही अर्जुनकडे पाहून हसू लागतात. पण कोणीच यावर काहीच रिअॅक्शन देत नाहीत. त्यानंतर पुन्हा सगळे चित्रपटाबद्दल बोलताना दिसत आहेत. पण हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
अर्जुन कपूरच्या ‘मेर हस्बंड की बीवी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन दिग्दर्शक मुदस्सर अजीज करत आहेत. या चित्रपटात डीनो मोरिया, हर्ष गुजराल आणि शक्ती कपूर यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट 21 फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे चित्रपटाचं प्रमोशन जोरदार सुरु आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List