Sunita Williams – सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवर परतणार, ‘या’ तारखेला लॉन्च केलं जाऊ शकतं क्रू-10 मिशन
हिंदुस्थानी वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून पृथ्वीवर परत आणण्याची तयारी सुरू आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासाने मंगळवारी सांगितले की, ते सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पूर्वी घोषित केलेल्या वेळेपेक्षा काही आठवडे आधीच पृथ्वीवर परत आणू शकतात. याआधी त्यांच्या परतीची अंतिम मुदत मार्च किंवा एप्रिलच्या अखेरीस निश्चित करण्यात आली होती. याचबाबत माहिती देताना नासाने सांगितलं की, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी स्पेसएक्सने क्रू ड्रॅगन कॅप्सूल बदलण्याचा निर्णय घेतला आहे. ज्याचा वापर ते त्यांच्या क्रू-10 मिशन उड्डाण करण्यासाठी करेल, जे आता 12 मार्च रोजी प्रक्षेपित होणार आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी 5 जून रोजी सुनीता विल्यम्स या बुच विल्मोर यांच्यासोबत आयएसएसवर पोहोचल्या होत्या. त्यांना तिथून एका आठवड्यानंतर परतायचे होते. दोघेही बोईंगच्या नवीन स्टारलाइनर कॅप्सूलची चाचणी घेण्यासाठी गेले होते. मात्र त्यात बिघाड झाल्यानंतर ते पुन्हा आयएसएसमध्येच थांबले. तेव्हापासून ते दोघेही तिथेच अडकले आहेत. आता त्यांना पुन्हा पुर्थ्वीवर परत आणण्याची तयारी सुरु आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List