38th National Games- मल्लखांबमध्ये महाराष्ट्राच्या जान्हवीची सुवर्ण हॅटट्रिक, रूपालीला रौप्य

38th National Games- मल्लखांबमध्ये महाराष्ट्राच्या जान्हवीची सुवर्ण हॅटट्रिक, रूपालीला रौप्य

जिम्नॉस्टिक्स पाठोपाठ मराठमोळ्या मल्लखांबतही महाराष्ट्राच्या महिला खेळाडूंनी 38 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपले वर्चस्व दाखवले आहे. दोरीचा मल्लखांब प्रकारात जान्हवी जाधवने सुवर्ण, तर रूपाली गंगावणेने रूपेरी यशाला गवसणी घातली. मुलींच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राने रौप्य पदकाची कमाई करीत आजचा दिवस गाजविला.

वन चेतना स्टेडियममध्ये सुरू असलेल्या मल्लखांब स्पर्धेत पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राचा बोलबोला सुरू आहे.दोरीचा मल्लखांब प्रकारात मुंबई उपनगरच्या जान्हवी जाधवने आपल्या लौकिकाला साजेसा असा खेळ करून सुवर्ण यशाची भरारी घेतली. विश्वकरंडक चॅम्पीयन असणार्‍या जान्हवीने कलात्मक प्रदर्शनकरीत अवघड रचना सादर करीत प्रेक्षकांची मने जिंकली. 8.65 गुणांची कमाई करीत सलग तिसर्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत जान्हवीने आपल्या यशाचा झेंडा फडकविला. मुंबईतील विलेपार्ले श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेत सराव करणार्‍या जान्हवीने अहमदाबाद स्पर्धेत 1 सुवर्ण 3 रौप्य तर गत गोवा स्पर्धेत 1 सुवर्ण, 1 कांस्य पदकांची लयलूट केली होती. वयाच्या 11 व्या वर्षापासून द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त गणेश देवरूखकर यांच्या मार्गदर्शन तिला लाभत आहे.

दोरीचा मल्लखांब प्रकारात मुंबईच्या खेळाडूंचा डंका वाजला. स्पर्धेत वयाने सर्वात मोठी असणारी 27 वर्षीय रूपाली गंगावणेने रूपेरी यश संपादले. चेंबुरमधील टमलिंग अ‍ॅकॅडमीत 8 तास सराव करणार्‍या रूपालीने 8.45 गुणांची कमाई करीत राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सलग तिसर्‍यांदा पदकाची हॅटट्रिक केली. अहमदाबादमधील स्पर्धेत 3 सुवर्ण 1 कांस्य, तर गत गोवा स्पर्धेत रूपालीने सुवर्ण चौकार झळकविला होता.

महिलांच्या सांघिक प्रकारात जान्हवी जाधव, नेहा क्षीरसागर, निधी राणे, पल्लवी शिंदे, प्रणाली मोरे व रूपाली गंगावणे यांनी 82.85 गुणांची कमाई करीत रौप्यपदक पटकावले. 83.20 गुण संपादून मध्य प्रदेश संघाने सुवर्ण पदक जिंकले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, ‘माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील’, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, ‘माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील’, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून हिंदी कलाविश्वात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियामणीने 2017 मध्ये लग्न केलं. इव्हेंट मॅनेजर आणि दिग्दर्शक...
सेन्सार बोर्डा, तुला काय कळणार आमच्या व्यथा? काय पुसतो, कोण नामदेव ढसाळ? विद्रोहाच्या मशाली अजून भकभकणार
“तिच्यापासून दूर राहणं पुरुषासाठी कठीण..”; असं कोणाबद्दल बोलला गोविंदा?
“सुनिताची फसवणूक केली तर..”; आईने गोविंदाला आधीच दिली होती वॉर्निंग
“माझ्या कुंडलीत 2 लग्न, सुनीताने यासाठी तयार रहावं…” दुसऱ्या लग्नाबद्दल गोविंदाने स्वत:च सांगितलं होतं
झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी चोरल्या 11 रिक्षा, दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल
मोखाड्यात अधिकाऱ्यांना पाझर फुटला, तहानलेल्या गावांत टँकर पोहोचले, अनेक गावपाड्यांना दिलासा