या अभिनेत्रीचा सिनेमा चक्क वर्गणी काढून पूर्ण केला; कोणी 100 तर कोणी 50,000 ची केली मदत

या अभिनेत्रीचा सिनेमा चक्क वर्गणी काढून पूर्ण केला; कोणी 100 तर कोणी 50,000 ची केली मदत

बॉलिवूडमध्येल किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये कधी काय होईल हे सांगता येणं कठीण आहे. कधी कोणी क्षणात फेमस होतं तर कधी कोणी क्षणात गायब. या झगमगत्या दुनियेतील प्रसंग नेहमीच अविश्वसनिय असतात. असाच काहीसा किस्सा घडला होता जो कदाचित कोणाला माहितही नसेल.

ही अभिनेत्री असलेला सिनेमा चक्क वर्गणी काढूण पूर्ण केला

एक प्रसिद्ध अभिनेता तथा निर्माते असे होते ज्यांच्यावर अशी वेळ आली होती की, त्यांच्याकडे चित्रपट बनवायला पैसेच नव्हते. या फिल्ममध्येही प्रसिद्ध अभिनेत्रीला कास्ट करण्यात आलं होत. शेवटी हा चित्रपट त्यांना चक्क वर्गणी गोळा करून पूर्ण करावा लागला होता. या चित्रपटातील ही अभिनेत्री होती मल्लिका शेरावत, आणि निर्माते होते रजत कपूर. जे एक प्रसिद्ध अभिनेतेही आहे.

चित्रपट बनवण्यासाठी चक्क नव्हते

रजत कपूर हे एक चांगले अभिनेते असण्यासोबतच एक चांगले दिग्दर्शक देखील आहे. रजत कपूर यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. काल म्हणजेच 11 फेब्रुवारी 2025 रोजी रजत कपूर त्यांचा 64 वा वाढदिवस होता. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम जरी केलं असलं किंवा ते एक उत्तम दिग्दर्शक असले तरी त्यांच्या आयुष्यात एकदा असा काळ आला होता जेव्हा त्यांच्याकडे चित्रपट बनवण्यासाठी चक्क पैसेचं नव्हते.

फिल्म इंडस्ट्रीत येण्यासाठी प्रचंड मेहनत

रजत कपूर यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये आमिर खानच्या ‘दिल चाहता है’ या चित्रपटाचा देखील समावेश आहे. तसेच ‘मान्सून वेंडिंग’ आणि ‘भेजा फ्राय’ सारख्या चित्रपटांमध्येही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये ते दिसले होते. रजत कपूर यांनी लहानपणीच ठरवले होते की त्यांना सिनेइंडस्ट्रीतच करिअर करायचे आहे. म्हणूनच, अभिनयातील बारकावे शिकण्यासाठी, ते प्रथम रंगभूमीवर त्यांनी काम केलं. नंतर ते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्ये अभिनय शिकले.

‘कायल गाथा’ चित्रपटासाठी मित्रांकडून पैसे घेतले

रजत कपूर यांनी 1989 मध्ये आलेल्या ‘कायल गाथा’ या चित्रपटातून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली. या चित्रपटातील त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना फिल्मफेअर क्रिटिक्स अवॉर्डनेही सन्मानित करण्यात आले. नंतर ते दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आले. पण त्यांच्यावर अशी एक वेळ आली होती की त्यांना त्यांचा चित्रपट वर्गणी घेऊन पूर्ण करावा लागला होता.

रजत कपूर यांनी ‘रघु रोमियो’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच दिग्दर्शन क्षेत्रात प्रवेश केला. पण त्यांच्याकडे हा चित्रपट बनवण्यासाठी पैसे नव्हते, परंतु त्यांनी हार मानली नाही. चित्रपट बनवण्यासाठी सर्व मित्रांकडून पैसे घेतले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat)

मित्रांकडून पैसे मिळाल्यानंतर रजत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला. मित्रांकडून पैसे मिळवून हा चित्रपट बनवण्यात आला मात्र तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप झाला, पण तरीही या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे, रजत कपूरला त्याच्या मित्रांकडून घेतलेले पैसे परत करण्यासाठी 3 वर्षांहून अधिक काळ लागला.

चित्रपटासाठी निधी उभारला तेव्हा…

चित्रपटासाठी निधी उभारण्याच्या त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना रजत कपूर म्हणाले, ” भारतीय चित्रपटांसाठी निधी मिळवणे नेहमीच कठीण असते. म्हणून यावेळी, मी क्राउडफंडिंगच्या कल्पनेने सुरुवात केली आणि लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. मी काही पैसे गुंतवले. माझे, आणि क्राउडफंडिंग प्रक्रियेच्या अर्ध्या टप्प्यात, प्रियम श्रीवास्तव आणि हर्षिता करकरे सह-निर्माते म्हणून काम करू लागले. चित्रपटावरील त्यांचा विश्वास अद्भुत होता आणि त्यांच्यासोबत मिळून काम केल्यामुळेच हा चित्रपट बनू शकला” असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. चित्रपटाच्या आर्थिक मदतीसाठी त्यांना सुमारे 800 लोकांनी कोणी 100 तर कोणी 50,000 रुपयांची मदत केली होती.

हा चित्रपट 22 जुलै 2022 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची निर्मिती प्रियांशी फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटात मल्लिका शेरावत, कुब्रा सैत, रणवीर शोरे, मनु ऋषी चढ्ढा, चंद्रचूर राय, अभिजीत देशपांडे, अभिषेक शर्मा, ग्रेस गिरधर आणि वैशाली मल्हारा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. एन्फ्लिक्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘आरके/आरके’ हा चित्रपट मिथ्या टॉकीज आणि प्रियाशी फिल्म्स प्रोडक्शनने रजत कपूर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केला आहे.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते, अखेर ‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत तो क्षण आलाच
गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते तो क्षण अखेर आलाय. ज्या रणदिवे कुटुंबातून काही दिवसांपूर्वी जानकी-ऋषिकेश...
‘झी मराठी’ वाहिनीवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; चाहते नाराज
‘या’ अभिनेत्रीमुळे देशात वाढली होती कंडोमची विक्री, बदलला लोकांचा दृष्टिकोन
रणबीरला ‘रेड फ्लॅग, वुमनायजर’ म्हणणाऱ्यांसाठी चाहतीची पोस्ट; आलियानेही दिली प्रतिक्रिया
Ashok Ma.Ma : अनिश आणि भैरवीने केले लग्न, ‘अशोक मा.मां’च्या आयुष्यात मोठे संकट
महाबळेश्वरवरील पाण्याचे संकट तात्पुरते टळले, 15 कोटींच्या थकबाकीपैकी पालिकेने 1 कोटी 37 लाख भरले
एलबीटी विभागाला टाळे ठोका, राज्यशासनाचे महापालिकेला आदेश; हजारो कोटींच्या वसुलीबाबत प्रश्नचिन्ह