आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे? GBS च्या वाढत्या धोक्याबाबत नाना पटोले यांचा सवाल

आणखी किती मृत्यू होण्याची वाट भाजपा सरकार पाहणार आहे? GBS च्या वाढत्या धोक्याबाबत नाना पटोले यांचा सवाल

राज्यात GBS चा पहिला रुग्ण सापडून एक महिना झाला आणि या एका महिन्यात या आजाराने 8 मृत्यू झाले आहेत. या आजाराचे रुग्ण आता मुंबईतही सापडत आहेत.मात्र, राज्य सरकार या आजाराकडे फारसे गांभिर्याने पहात असल्याचे दिसत नाही, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

नाना पटोले म्हणाले की, जीबीएसचा पहिला रुग्ण 9 जानेवारीला पुण्यात सापडला आणि आतापर्यंत जवळपास 170 ते 175 रुग्ण असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये 100 पेक्षा जास्त रुग्ण पुणे शहर, ग्रामीण तसेच पिंपरी-चिंचवड परिसरात सापडले आहेत. यातील 50 रुग्ण आयसीयुमध्ये असल्याचे समजते. मुंबईत या आजाराने एकाचा मृत्यू झाला. जीबीएस रुग्णांसाठी सरकारी रुग्णालयात विशेष व्यवस्था करण्याच्या सुचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. त्याचे पुढे काय झाले? सरकारने यासाठी काही विशेष उपाय योजना केल्या आहेत का? जीबीएसच्या रुग्णाला द्याव्या लागणाऱ्या एका इंजेक्शनची किंमत 20 हजार रुपये आहे असे समजते. एवढ्या किंमतीचे इंजेक्शन सर्वसामान्यांना परवडणारे नाही. राज्य सरकारने त्यासाठी काही तरतूद केली आहे का? केवळ सूचना करून काही होणार नाही, ठोस पावले उचलावी लागतील, असे नाना पटोले म्हणाले.

जीबीएसमुळे पहिला मृत्यू झाला त्याचवेळी आम्ही सरकारला जागे केले होते. पण सरकारला त्यांच्यातील अंतर्गत वादातून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. राज्याचा आरोग्य विभाग या आजाराला तोंड देण्यासाठी किती सक्षम आहे, काय उपाययोजना केल्या, खबरदारी काय घ्यावी यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी कोट्यवधी रुपयांची जाहिराबाजी केली जाते. मात्र, जीबीएससारख्या गंभीर आजाराच्या जनजागृतीसाठी व उपाय योजनांसाठी सरकार पैसा खर्च करत नसेल तर राज्याचे दुर्दैव आहे असेही नाना पटोले म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, ‘माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील’, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा साखरपुड्याची गोड बातमी दिली, तर ट्रोलर्स म्हणाले, ‘माझी मुलं ISIS मध्ये भरती होतील’, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा
‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमधून हिंदी कलाविश्वात प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री प्रियामणीने 2017 मध्ये लग्न केलं. इव्हेंट मॅनेजर आणि दिग्दर्शक...
सेन्सार बोर्डा, तुला काय कळणार आमच्या व्यथा? काय पुसतो, कोण नामदेव ढसाळ? विद्रोहाच्या मशाली अजून भकभकणार
“तिच्यापासून दूर राहणं पुरुषासाठी कठीण..”; असं कोणाबद्दल बोलला गोविंदा?
“सुनिताची फसवणूक केली तर..”; आईने गोविंदाला आधीच दिली होती वॉर्निंग
“माझ्या कुंडलीत 2 लग्न, सुनीताने यासाठी तयार रहावं…” दुसऱ्या लग्नाबद्दल गोविंदाने स्वत:च सांगितलं होतं
झटपट श्रीमंतीसाठी त्यांनी चोरल्या 11 रिक्षा, दोघांना अटक; सहा गुन्ह्यांची उकल
मोखाड्यात अधिकाऱ्यांना पाझर फुटला, तहानलेल्या गावांत टँकर पोहोचले, अनेक गावपाड्यांना दिलासा