‘दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे…,’ काय म्हणाले संजय शिरसाट

‘दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे…,’ काय म्हणाले संजय शिरसाट

आनंद दिघे यांच्या जीवनावरील धर्मवीर – 2 हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित केले गेगेले आहे. या चित्रपटावरून महाराष्ट्रात राजकारण सुरु आहे.या संदर्भात कालच एकनाथ शिंदे गटाचे नेते संजय शिरसाठ यांनी खळबळ जनक वक्तव्य केले आहे. दिघे यांना मारलं गेलं हे अख्ख्या ठाणे जिल्ह्याला माहिती आहे अशा आशयाचे वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलेले आहे. त्यावर पुन्हा आज संजय शिरसाट यांनी भाष्य केले आहे. दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती. त्यामुळे हे सर्व झाल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.

संजय शिरसाट पुढे म्हणाले की काल मी दिघे साहेबांच्या मृत्युसंदर्भात वक्तव्य केले, त्याचे पडसाद राज्यभर उमटले.मात्र माझी जी शंका होती त्यावर मी बोललो. दिघे साहेबांवर बाळासाहेबांचे अतोनात प्रेम होते,दिघे साहेबांनी कधी बाळासाहेबांच्या बाजुला देखील बसण्याची हिम्मत केली नाही. मात्र, दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे हे सर्व झाल्याचे शिरसाट म्हणाले. दादरमध्ये एक मेळावा झाला, त्यात गद्दार नेता नव्हता, त्यावेळी आनंद दिघे साहेब त्याला शोधत होते. राज ठाकरे का गेले कुणामुळे गेले ? याची कारण काय? हे सर्व लोक कुणाच्या मुळे गेले ? हे सामोर आलेले नाही. त्यांची अडचण होणाऱ्या लोकांनीच त्यांचा खून केला असा माझा आरोप असल्याचे शिरसाट यावेळी म्हणाले.

आनंद दिघेला मोठया पदावर बसवलं तर आपल्याला अडचण होईल त्याच लोकांनी त्यांचा काटा काढला. मी अशी अनेक प्रकरण नावानिशी उघड करण्याची ताकत ठेवतो असेही संजय शिरसाट यावेळी म्हणाले. आज पण ही लोकं त्याचं वेळेसारखे राजकारण करत आहेत. इथे मोठं होणारा नको आमच्या चालीने चालणारा हवा अशा भूमिकेतील ती लोक आहेत. त्या लोकांमुळेच राणे साहेब, भुजबळ साहेब, राज साहेबांनी पक्ष सोडला. ती गेलेली लोक शिवसेना प्रमुख यांच्या विरोधात नव्हती यांच्यामुळे गेली असाही आरोप संजय शिरसाट यांनी केला.

एकनाथ शिंदेंना सुरक्षा का नाकारली ?

शिंदे साहेबांना नक्षलीच्या नावाने धमक्या का येतं होत्या ? एवढ्या धमक्या येऊन त्यांना सुरक्षा का पुरविली नव्हती, मात्र शिंदे साहेब खंबीर होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा नाकारणे म्हणजे शहीद करण्याचा विचार होता ना ? असा आरोप संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता केला. राणे साहेब किंवा भुजबळ असेल त्यावेळी आम्ही एकत्र होतो. कणकवली मध्ये राडा केलेली आम्ही लोकं आहोत असेही शिरसाट म्हणाले. दसरा मेळाव्या संदर्भात विचारले असता दसरा मेळावा कुठे घ्यायचा हे शिंदे साहेब ठरवतील असे उत्तर संजय शिरसाट यांनी दिले आहे. रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूकांचा सर्वे काढला आहे. त्याबाबत विचारले असता ते म्हणाले की आमचा सर्वे आमच्याकडे राहू द्या. त्यात ढुंकून पाहू नका असे आवाहन त्यांनी केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले… ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले…
बॉलीवूड अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबातील सून ऐश्वर्या राय बच्चन नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांमुळे वेगवेगळी चर्चा होत...
पाजपंढरीत वाहतूक कोंडी; दोन्ही दिशांची वाहतूक बंद पडल्याने प्रवासी बेहाल
पॉर्नस्टार रिया बर्डेला वाचवण्यासाठी वकिलांची फौज, दीड तास चालली सुनावणी
Ratnagiri News – गणपतीपुळे समुद्रात पोहायला गेलेले दोघे बुडाले, मयत JSW कंपनीचे कर्मचारी
कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या तिघा भावांकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, दोघांना अटक
Dapoli News – मुरुड समुद्र किनाऱ्यावर चेजिंग रुमच्या उभारणीसाठी प्रतिक्षा
पोलीस बंदोबस्तात अक्षय शिंदे उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफन, सहा दिवसांनी अखेर अंत्यसंस्कार