तो येतोय… कुणाचे बॅनर्स?, अचानक शेकडो बॅनर्स लागल्याने नवी मुंबईत चर्चांना उधाण

तो येतोय… कुणाचे बॅनर्स?, अचानक शेकडो बॅनर्स लागल्याने नवी मुंबईत चर्चांना उधाण

सध्या राजकारण हा इव्हेंटचा पण विषय ठरला आहे. राजकारणात चर्चेशिवाय मजा नाही, हे आता नवीन सूत्र समोर येत आहे. हवा केल्याशिवाय कोणी भाव देणार नाही, चर्चा होणार नाही या गोष्टी ओघाने आल्याच. त्यासाठी काही जण अनेक ट्रिक्स, आयडिया लढवतात. त्यातच सध्या विविध आंदोलनं, मोर्चे, उपोषण यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. आता नवी मुंबईत लागलेल्या बॅनर्संनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. अचानक इतके बॅनर लागल्याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काय घडामोड घडते आणि कुणाला धक्का बसतो याची खमंग चर्चा रंगली आहे.

तो येतोय.. बॅनरचा धुमाकूळ

तो येतोय.. अशा आशयाचे बॅनर सध्या नवी मुंबईच्या ऐरोली मधे झळकले आहेत. हे बॅनर नवी मुंबईकराचं लक्ष वेधून घेत आहेत. तो येतोय घराणेशाहीला सर्व सामन्यांची ताकद दाखवायला. तो येतोय माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करायला. तो येतोय नवी मुंबईकरांना टोल पासून मुक्ती द्यायला, असे आशय या बॅनरवर लिहला आहे. या बॅनरने नवी मुंबईत नुसता धुमाकूळ घातला आहे. हे बॅनर नवी मुंबईतील ऐरोली विधानसभा क्षेत्रामध्ये झळकले आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत या भागातील राजकारण तापण्याची चर्चा जोर धरत आहे. कुणाला या माध्यमातून इशारा देण्यात येत आहे, कुणाला धक्का देण्यात येणार आहे, हे लवकरच समोर येईल.

गणेश नाईक यांना आव्हान

या बॅनरच्या माध्यमातून भाजपा आमदार गणेश नाईक यांना थेट आव्हान देण्याचा जो प्रयत्न आहे, तो केला गेला आहे, अशी चर्चा रंगली आहे. तसंच हे बॅनर कोणी झळकवले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी नाईकांना या माध्यमातून आव्हान कुणीतरी देत आहे. विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीनेच हे बॅनर लावल्याचे समोर येत आहे. हे बॅनर कोणी लावले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी काही दिवसातच त्यावरुन पडदा उठणार आहे.

बॅनर लिहलंय काय?

मी येतोय, घराणे शाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी, मी येतोय पश्चिम महाराष्ट्रातील सुपुत्र आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी, मी येतोय टोल माफी मिळवून देण्यासाठी, मी येतोय महिला भगिनींच्या रक्षणासाठी अश्या विविध टॅग लाईन देत हे बॅनर लावण्यात आले असून प्रत्येकाची नजर या बॅनरवर खिळून राहत आहे.

नेमके कोण येतोय अशी चर्चा आता शहरातील सर्व भागात रंगलेली पहायला मिळत असून नवी मुंबईकरांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली पहायला मिळतेय. यामुळे नवी मुंबईतील प्रस्थापित नेत्यांचे धाबे दणाणले आहे. नेमकं येतंय कोण याची उत्सुकता नवी मुंबईकरांमध्ये पहायला मिळत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले… ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले…
बॉलीवूड अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबातील सून ऐश्वर्या राय बच्चन नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांमुळे वेगवेगळी चर्चा होत...
पाजपंढरीत वाहतूक कोंडी; दोन्ही दिशांची वाहतूक बंद पडल्याने प्रवासी बेहाल
पॉर्नस्टार रिया बर्डेला वाचवण्यासाठी वकिलांची फौज, दीड तास चालली सुनावणी
Ratnagiri News – गणपतीपुळे समुद्रात पोहायला गेलेले दोघे बुडाले, मयत JSW कंपनीचे कर्मचारी
कोचिंग क्लासेस चालवणाऱ्या तिघा भावांकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार, दोघांना अटक
Dapoli News – मुरुड समुद्र किनाऱ्यावर चेजिंग रुमच्या उभारणीसाठी प्रतिक्षा
पोलीस बंदोबस्तात अक्षय शिंदे उल्हासनगरच्या स्मशानभूमीत दफन, सहा दिवसांनी अखेर अंत्यसंस्कार