लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ

लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील तिजोरीवर मोठा ताण आला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस सोडा सणासुदीत पगार तरी मिळेल की नाही, याची खात्री नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्यातच संजय राऊत यांनी लाडकी बहीण योजनेचे कवित्व किती महागात पडेल याची उजळणी केली. त्यांनी सरकारवर घणाघाती टीका केली. राज्यात अर्थखाते केवळ नावालाच उरल्याचा आरोप त्यांनी केला.

पगार मिळण्याची शक्यता नाही

लाडकी बहीण योजनेमुळे होमगार्ड आणि सेक्युरीटींना पगार मिळतील की नाही याची शंका आहे. योजनेकडे सर्व पैसा वळवला आहे. या योजनेचं श्रेय घेण्याची चढाओढ सुरू आहे. फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना पत्र पाठवलं आहे. त्यात त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव वगळलं आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील मुख्यमंत्री हा शब्द वगळला आहे. माझ्याकडे पत्र आहे. भाजपनेच ही योजना कशी आणली, आम्हीच कशी आणली हे दाखवण्याचं श्रेय फडणवीस यांनी करत आहे, असा आरोप आज सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान या ठिकाणी या योजना सुरू होत्या. फक्त निवडणुकीसाठी या योजना आणण्यात आल्या. तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर लाडक्या बहीण योजनेचा कोणताही पैसा जाणार नाही. ही योजना जुमला आहे. भ्रष्टाचार आहे, असं स्वत नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक राज्यात जाऊन म्हटलं आहे. अर्थ खातं अस्तित्वात नाही, खडखडाट आहे. तिजोरी रिकामी आहे. तरीही मतांसाठी योजना रेटली जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

हा निवडणूक फंडा

मध्यप्रदेश, गोवा राजस्थान अशा ठिकाणी या लाडक्या बहिणींच्या योजना सुरू होत्या त्या योजना महाराष्ट्र मध्ये आणून फक्त निवडणुकीसाठी त्याचा वापर करण्यात येत आहे. तिसऱ्या किंवा चौथ्या महिन्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात कोणताही हप्ता जाणार नाही निवडणुकीसाठी केलेला फंडा आहे असे मी म्हणत नसून नरेंद्र मोदी प्रधानमंत्री म्हणतात, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्रीच…शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्रीच…शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी महायुतीमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा...
महायुती सरकार महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे लिहिणार का? विजय वडेट्टीवार यांचा संताप, सरकारवर घणाघात
नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, 112 ठार; कोसीची पाणीपातळी वाढल्याने बिहारही जलमय, 56 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी लावलेले आयईडी डिफ्युज करताना स्फोट , CRPF चे पाच जवान जखमी
महाराष्ट्र विक्री आहे! जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात; अंबादास दानवेंचा मिंधे सरकारवर हल्लाबोल
‘हेलेन’चा अमेरिकेत तर मॅक्सिकोमध्ये ‘जॉन’ चक्रीवादळाचा धुमाकूळ, 50 हून अधिक लोकांचा मृत्यू
लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ