IIFA 2024: सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख, तर अभिनेत्री राणी मुखर्जी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

IIFA 2024: सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख, तर अभिनेत्री राणी मुखर्जी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी

अबु धाबीमधील यास आयलँडवर अत्यंत प्रतिष्ठित आयफा पुरस्कार सोहळा पार पडला. 27 सप्टेंबरपासून 29 सप्टेंबरपर्यंत हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून बॉलिवूडपासून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटींची या सोहळ्याला उपस्थिती पहायला मिळाली. हेमा मालिनी, रेखा, शाहरुख खान, राणी मुखर्जी, अनिल कपूर, बॉबी देओल, विकी कौशल, शाहिद कपूर आणि क्रिती सनॉन यांसारख्या सेलिब्रिटींनी या पुरस्कार सोहळ्याला चार चाँद लावले. बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने आयफा पुरस्कार सोहळ्याचं सूत्रसंचालन केलं. विकी कौशल आणि करण जोहरने त्याची साथ दिली. यावेळी त्याने ‘झुमे जो पठान’ या गाण्यावर डान्ससुद्धा सादर केला.

विजेत्यांची संपूर्ण यादी-

सर्वोत्कृष्ट चित्रपट- संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल
सर्वोत्कृष्ट अभिनेता- शाहरुख खान (जवान)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- राणी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- विधू विनोद चोप्रा (बारवी फेल)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- अनिल कपूर (ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- शबाना आझमी (रॉकी और रानी की प्रेम कहान)
सर्वोत्कृष्ट खलनायकी अभिनेता- बॉबी देओल (ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट कथा- रॉकी और रानी की प्रेम कहानी
सर्वोत्कृष्ट कथा (ॲडाप्टेड)- बारवी फेल
सर्वोत्कृष्ट संगीत- ॲनिमल
सर्वोत्कृष्ट गाण्याचे बोल- सिद्धार्थ गरिमा (सतरंगा, ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट गायक- भूपिंदर बब्बल (अर्जन वेल्ली, ॲनिमल)
सर्वोत्कृष्ट गायिका- शिल्पा राव (चलेया)
भारतीय सिनेमातील अमूल्य योगदान- जयंतीलाल गडा, हेमा मालिनी
सिनेसृष्टीत 25 वर्षे पूर्ण केल्याबद्दल- करण जोहर

सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खान म्हणाला, “रणवीर सिंग, रणबीर कपूर, विक्रांत मेस्सी, विकी कौशल, सनी पाजी या सर्व नामांकित झालेल्या कलाकारांचे मी आभार मानतो. सर्वांनी खूप चांगलं काम केलंय, पण कदाचित मी बऱ्याच काळानंतर चित्रपटात परतल्याने प्रेक्षक खूप खुश झाले आहेत. म्हणून मला हा पुरस्कार मिळाला आहे. मी पत्नी गौरीचेही खूप आभार मानतो. कारण ती एकमेव अशी पत्नी असेल जी पतीवर जास्त पैसा खर्च करत असेल. जवान या चित्रपटाच्या निर्मितीदरम्यान आम्हाला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता.”

27 सप्टेंबर रोजी ‘आयफा उत्सवम’ पार पडला. तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या चार दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीसाठी हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्रीच…शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्रीच…शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी महायुतीमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा...
महायुती सरकार महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे लिहिणार का? विजय वडेट्टीवार यांचा संताप, सरकारवर घणाघात
नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, 112 ठार; कोसीची पाणीपातळी वाढल्याने बिहारही जलमय, 56 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी लावलेले आयईडी डिफ्युज करताना स्फोट , CRPF चे पाच जवान जखमी
महाराष्ट्र विक्री आहे! जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात; अंबादास दानवेंचा मिंधे सरकारवर हल्लाबोल
‘हेलेन’चा अमेरिकेत तर मॅक्सिकोमध्ये ‘जॉन’ चक्रीवादळाचा धुमाकूळ, 50 हून अधिक लोकांचा मृत्यू
लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ