डरकाळी ठाकरेंचीच… मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेची क्लीन स्वीप; विरोधकांची एकही सीट…

डरकाळी ठाकरेंचीच… मुंबई विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत युवासेनेची क्लीन स्वीप; विरोधकांची एकही सीट…

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीच्या दहाही जागांचे निकाल हाती आले आहेत. या दहाही जागांवर ठाकरेंच्या युवा सेनेने दणदणीत आणि खणखणीत विजय मिळवला आहे. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने सिनेट निवडणुकीत क्लीन स्वीप करून पुन्हा एकदा विद्यापीठावर आपलाच दबदबा असल्याचं दाखवून दिलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच ठाकरे गटाला अत्यंत प्रतिष्ठेच्या विद्यापीठाच्या निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळाल्याने ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साह संचारला आहे.

आज मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीची मतमोजणी झाली. पहिल्या निकालापासूनच ठाकरेंची युवा सेना आघाडीवर होती. दहाव्या जागेचा निकाल रात्री 11 वाजून 35 मिनिटांनी आला. युवा सेनेने 10 पैकी 9 जागा जिंकल्यानंतर दहावी जागा तरी आपल्या वाट्याला येते का? याकडे विरोधकांचं लक्ष होतं. पण व्यवस्थित नियोजन, विश्वासहार्यता आणि केलेल्या कामाची पोचपावती म्हणून पदवीधर मतदारांनी युवासेनेच्या बाजूनेच दहाव्या जागेचाही कौल दिला आणि विरोधकांचा सुपडा साफ झाला.

पुन्हा पुनरावृत्ती

शेवटच्या दोन फेऱ्यानंतर युवासेनेने दहावी जागा जिंकली. युवा सेनेचे किसन सावंत हे विजयी झाले. ही दहावी जागा जिंकल्याने युवासेनेने 2018 च्या मुंबई सिनेट निवडणुकीची पुनरावृत्ती केली आहे. 2018मध्येही युवासेनेने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात 10 पैकी 10 जागा जिंकल्या होत्या. या निवडणुकीतही पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीवर युवा सेनेने पूर्णपणे वर्चस्व दाखवेल आहे.

हे उमेदवार जिंकले

युवा सेनेचे मयूर पांचाळ यांना 5350 मते मिळाली आहेत. पांचाळ यांनी अभाविपचे उमेदवार राकेश भुजबळ यांचा पराभव केला आहे. भुजबळ यांना केवळ 888 मते मिळाली. तर युवासेनेच्या स्नेहा गवळी यांना 5914 मते मिळाली. त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेणूका ठाकूर यांना केवळ 893 मते मिळाली.

शीतल शेठ देवरुखकर यांना 5489 मते मिळाली. त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे उमेदवार राजेंद्र सायगावकर यांचा पराभव केला. सायगावकर यांना 1014 मते मिळाली. युवा सेनेच्या धनराज कोहचडे यांना 5247 मते मिळाली आहेत. अभाविपच्या निशा सावरा यांचा त्यांनी पराभव केला. निशा यांना केवळ 924 मते मिळाली. युवासेनेचे शशिकांत झोरे यांना 5170 मते मिळाली आहे. त्यांनी अभाविपचे उमेदवार अजिंक्य जाधव यांचा पराभव केला आहे. अजिंक्य यांना 1066 मते मिळाली.

युवासेनेचे प्रदीप सावंत हे खुल्या प्रवर्गातून हे खुल्या प्रवर्गातून विजयी झाले आहेत. त्यांना पहिल्या पसंतीचे 1338 हून अधिक मते मिळाली आहेत. सलग तिसऱ्यांदा विजयी होण्याची हॅट्ट्रीक त्यांनी साधली आहे. युवासेनेचे उमेदवार मिलिंद साटम, परम यादव आणि किसन सावंत हे विजयी झाले आहेत. अल्पेश भोईर हे 1137 मते मिळवून विजयी झाले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराची स्वच्छता सुरू, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन आज राहणार बंद नवरात्रोत्सवानिमित्त मंदिराची स्वच्छता सुरू, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे दर्शन आज राहणार बंद
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात शारदीय नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी सुरू असून मंदिर स्वच्छतेला प्रारंभ झाला...
गोंड गोवारी जमातीच्या आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापला, नागपुरात हजारो उतरले रस्त्यावर
एआयची कमाल! केवळ आवाजावरून बिल्डरला संभाव्य ग्राहक कळणार
दिल्लीत प्रदूषणामुळे आणीबाणीसारखी स्थिती; काय कारवाई केली? सर्वोच्च न्यायालयाने कमिशन फॉर एअर क्वालिटी मॅनेजमेंटला फटकारले
शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या दणक्यानंतर खासगी क्लास चालक वठणीवर! ग्राहकाला आगाऊ फीचे पैसे केले परत
इस्रायलने केलेहिजबुल्लाहचे मुख्यालय जमीनदोस्त; बैरूतमध्ये स्फोटांचा प्रचंड धूमधडाका, हिजबुल्लाह प्रमुख नसरल्ला होता लक्ष्य
लडाखमधून चीन सैन्य मागे घेणार