सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका, भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव, वाचा A टू Z निकाल

सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका, भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव, वाचा A टू Z निकाल

मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर येत आहे. ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. निवडणूक वारंवार पुढे ढकलण्यात येत असल्यामुळे विरोधक आक्रमक झाले होते. अखेर या निवडणुकीसाठी 24 सप्टेंबर 2024 ला मतदान पार पडलं होतं. विद्यापीठाच्या 10 नोंदणीकृत पदवीधारकांच्या जागांसाठी ही निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत एकूण 28 उमेदवारांनी अर्ज केला होता. तरीही ठाकरे गटाची युवासेना विरुद्ध भाजप पुरस्कृत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्यात या निवडणुकीत थेट लढत झाली. या निवडणुकीचे निकाल आज समोर येत आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे. आतापर्यंत पाच जागांचे निकाल समोर आले आहेत. या पाचही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या सिनेट निवडणुकीत पालघरचे भाजप खासदार हेमंत सावरा यांच्या बहीण निशा सावरा यांनीदेखील उमेदवारी लढवली होती. त्यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. निशा सावरा यांचे वडील हे विष्णू सावरा हे माजी आदिवासी मंत्री आहेत.

पाच आरक्षित जागांवर उमेदवारांना मिळालेली उमेदवारांना मते

मुंबई महापालिकेच्या सिनेट निवडणुकीतील 5 आरक्षित जागांचा निकाल आतापर्यंत समोर आला आहे. या पाचही जागांवर युवासेनेच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. महिला प्रवर्ग म्हणून आरक्षित असलेल्या जागेवर युवासेनेच्या उमेदवार स्नेहा गवळी विरुद्ध अभाविपच्या रेणूका ठाकूर या निवडणुकीच्या मैदानात होत्या. या निवडणुकीत स्नेहा गवळी यांचा तब्बल 5914 एवढ्या दणदणीत मतांनी विजय झाला आहे. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रेणूका ठाकूर यांना केवळ 893 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.

सिनेट निवडणुकीत SC प्रवर्गातून युवासेनेकडून शीतल शेठ देवरुखकर यांनी अर्ज केला होता. तर अभाविपकडून राजेंद्र सायगावकर यांनी अर्ज दाखल केला होता. दोन्ही उमेदवारांमध्ये लढत झाली पण या जागेवरही युवासेनेने सहज विजय मिळवला. युवासेनेच्या शीतल शेठ देवरुखकर यांना तब्बल 5489 मतांनी विजय झाला. तर अभाविपचे राजेंद्र सायगावकर यांना केवळ 1014 मतांवर समाधान मानावं लागलं.

OBC प्रवर्गातून युवासेनेकडून मयूर पांचाळ यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. तर अभाविपकडून राकेश भुजबळ यांनी अर्ज भरला होता. दोन्ही उमेदवारांमध्ये काँटे की टक्कर होईल असं वाटत असताना युवासेनेचे मयूर पांचाळ यांनी 5350 मते मिळवत विजय मिळवला. तर राकेश भुजबळ यांना केवळ 888 मते मिळाली.

ST प्रवर्गातून धनराज कोहचडे हे युवासेनेचे उमेदवार होते. तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निशा सावरा या उमेदवार होत्या. निशा सावरा यांचे वडील विष्णू सावरा हे माजी आदिवासी मंत्री आहेत. तसेच त्यांचे भाऊ हेमंत सावरा हे पालघरचे विद्यमान भाजप खासदार आहेत. पण तरीदेखील भाजपची ताकद या निवडणुकीत कमी पडली. या जागेवरही युवासेनेची जादू कायम राहिली. युवासेनेचे उमेदवार धनराज कोहचडे यांना ५२४७ मते मिळाली तर अभाविपच्या निशा सावरा यांना केवळ ९२४ मतांवर समाधान मानावं लागलं.

NT प्रवर्गातून युवासेनेकडून शशिकांत झोरे उमेदवार होते. तर अभाविपकडून अजिंक्य जाधव उमेदवार होते. या जागेवरही युनासेनेचे उमेदवार शशिकांत झोरे विजयी झाले. त्यांना ५१७० मते मिळाली तर अजिंक्य जाधव यांना केवळ १०६६ जागांवर समाधान मानावं लागलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत OBC प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला. सर्वात आधी मयूर पांचाळ...
सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…
ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची हॅट्ट्रिक
जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात FIR दाखल
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री करतात; केजरीवालांची मोदींवर घणाघाती टीका
विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र