देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला करायचं सलमान खानशी लग्न? भाजप पदाधिकारीचा दावा

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला करायचं सलमान खानशी लग्न? भाजप पदाधिकारीचा दावा

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेची अखेर ओळख पटली आहे. संबंधित महिला ही मनोरुग्ण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षदा तेंडूलकर यांनी संबंधित महिलेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. या महिलेला सलमान खान सोबत लग्न करायचं आहे. तसेच ती बॅगेत नेहमी चाकू ठेवते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. “ही महिला पूर्ण सोसायटीसाठी डेंजर आहे. तिचं कुणीच नाही. ती एकटी राहते. तिचं लग्न झालेलं नाही. ती असंच वागते. तिची बहीण देखील सोडून गेलेली आहे. तिची मोठी बहीण देखील तिला घाबरुन इथे राहत नाही. म्हणजे आता काय बोलायचं? मानसिक अस्वस्थ कुणीही होऊ शकतं. त्यांना ट्रिटमेंटची गरज आहे. तिचं नाव धनश्री सहस्त्रबुद्धे असं आहे. तिचं वय माझ्यामध्ये 36 इतकं असेल. तिचं लग्न झालेलं नाही. ती सिंगल आहे. ती बाबांना खूप त्रास द्यायची. त्यांचं वय 92 इतकं होतं. ते वयस्कर होते. त्यांना ती खूप त्रास द्यायची. त्यांनी हिच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. दीड वर्षाआधी ही घटना घडली होती”, अशी माहिती भाजपच्या महिला पदाधिकारी अक्षदा तेंडूलकर यांनी दिली.

अक्षदा तेंडूलकर काय म्हणाल्या?

“ती उच्च शिक्षित आहे. पण काही गोष्टींना उपाय नसतो. तिला इथून दुसरीकडे शिफ्ट करा. तिला या इमारतीत ठेवू नका. तिच्यावर योग्यप्रकारे उपचार करा. तिला हॉस्पिटल किंवा जेल जिथे असेल तिथे दाखल करा. कारण आमच्या ऑफिसला ती तीनवेळा आली आहे. पहिल्या वेळेला आल्यानंतर पोलिसांनी आमच्या कार्यालयाचा सुरक्षा दिली होती. पण आमच्या कार्यालयाला सुरक्षेची गरज नाही. कारण आमच्या कार्यालयात कुणी ना कुणी असतं त्यामुळे आम्ही म्हटलं ठीक आहे. ती बांबू घेऊन फिरायची”, असं अक्षदा तेंडूलकर यांनी सांगितलं.

“तिला सलमान खान बरोबर लग्न करायचं आहे. सारखं तिचं सुरु असतं की, मला सलमान खान याच्याकडे घेऊन जा. आता मी काय बोलू? तिच्या बॅगेत चाकू असतो. ती स्वत:देखील बोलते की, तिच्या बॅगेत चाकू असतो. तिला कुणी अडवत नाही. ती रेग्यूलर आमच्या ऑफिसबाहेर येते आणि मला शिवी देवून जाते. ती स्वत: भाजपची समर्थक आहेत. तिला काहीतरी मदतीची गरज आहे”, असं देखील तेंडुलकर यांनी सांगितलं.

“सरकारला एवढंच म्हणेण, देवेंद्र फडणवीस आमचे नेते आहेत. पण सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तो प्रश्न पुन्हा येऊ नये. उद्या कोणीतरी तसा हेतू घेऊन गेलं तर किती मोठं नुकसान होऊ शकतं? याची गंभीरता स्थानिक पोलिसांनी घेतली पाहिजे. याआधीदेखील अनेक घटना घडल्या आहेत. सोसायटीत गाडी फोडली, सीसीटीव्ही फोडली आणि सेक्रेटरीच्या अंगावर गेली, अशा वेगवेगळे एफआयआर आहेत. या प्रकरणाला पोलिसांनी गंभीरतेने घेतले पाहिजे. सोसायटीत लहान मुलं खेळत असतात. लिफ्टमध्ये अनेकजण एकटे जातात”, अशी प्रतिक्रिया भाजपच्या पदाधिकारी अक्षदा तेंडूलकर यांनी दिली.

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयावर हल्ला करणार्‍या महिलेची ओळख काय?

  • दादरमधील एका सोसायटीत राहणारी ही महिला
  • सोसायटीत सुद्धा चाकू घेऊन फिरते
  • लोकांच्या दारांवर झाडूने मारते
  • तिचे अनेक व्हीडिओ समोर
  • यापूर्वी सुद्धा ती मंत्रालयात सातत्याने येते.
  • मला सलमान खानचा फोन नंबर द्या, लग्न करायचे आहे, अशी मागणी ती करीत असते
  • अनेक राजकीय नेत्यांना ती सातत्याने फोन करुन सलमानचा नंबर मागते
  • यापूर्वी भाजपा कार्यालयात जाऊनही तिने धमकावले होते, त्याची रितसर तक्रार त्यावेळी करण्यात आली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली मुंबईत ताकद ठाकरेंचीच! युवासेनेच्या शिलेदारांनी विरोधकांना अक्षरश: धूळ चारली
मुंबई विद्यापीठ नोंदणीकृत पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीत OBC प्रवर्गातून युवासेनेचे उमेदवार मयूर पांचाळ यांचा विजय झाला. सर्वात आधी मयूर पांचाळ...
सैफ अली खान याने केले राहुल गांधीबद्दल अत्यंत मोठे भाष्य, म्हणाला, देशाला…
ऐश्वर्या राय हिच्यावर प्रश्नांचा भडीमार, लोक संतापले, म्हणाले, कधीतरी…
मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत आतापर्यंत युवासेनेने 10 पैकी 8 जागा जिंकल्या, शशिकांत झोरे यांची हॅट्ट्रिक
जमीन घोटाळाप्रकरणी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांविरोधात FIR दाखल
पंतप्रधान ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात त्याला उपमुख्यमंत्री करतात; केजरीवालांची मोदींवर घणाघाती टीका
विधानसभा निवडणूक निःपक्षपातीपणे पार पाडण्यासाठी रश्मी शुक्लांनापदावरून हटवा; काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पत्र