देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलीस, काय घडतंय?

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर पोलीस, काय घडतंय?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोड करणाऱ्या महिलेच्या घराबाहेर आता पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांचा मोठा फौजफाटा, महिला पोलीस तिथे पोहोचले आहेत. पोलिसांकडून महिलेला घराचा दरवाजा उघडण्याची विनंती केली जात आहे. पण महिला दरवाजा उघडत नाहीय. महिला पोलिसांकडून या महिलेचं समूपदेशन केलं जाण्याची शक्यता आहे. पण महिला दरवाजा उघडण्याच्या मनस्थितीत नाही. महिलेने काल संध्याकाळी मंत्रालयात जावून सहाव्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाबाहेर आरडाओरड केली. महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी फोडली. तसेच तिथल्या कुंड्या देखील फोडल्याची माहिती आहे. यावेळी महिलेने प्रचंड आरडाओरडही केल्याची माहिती आहे. महिलेचा तोडफोड करतानाचा व्हिडीओ आज समोर आला आहे. यानंतर पोलीस कामाला लागले आहेत.

पोलिसांनी संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर महिलेची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अखेर महिला नेमकी कुठे राहते? याची माहिती पोलिसांकडून घेण्यात आली. पोलिसांनी महिलेचा घरचा पत्ता शोधून काढला आहे. पोलिसांचं पथक संबंधित महिलेच्या इमारतीत पोहोचले आहे. यामध्ये महिला पोलिसांचा देखील मोठा समावेश आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा संबंधित इमारतीच्या खाली आहे. पोलिसांकडून महिलेला घराचा दरवाजा उघडण्यासाठी आवाहन केलं जात आहे. पण मला दरवाजा उघडायला तयार नाही.

महिला मनोरुग्ण असल्याची माहिती, गुन्हा दाखल होणार?

स्थानिकांच्या माहितीनुसार, संबंधित महिलेचं मानसिक संतुलन बिघडलं आहे आणि तिच्या विरोधात इमारतीमध्ये देखील अनेक तक्रारी आहेत. पोलिसांनी महिलेच्या नातेवाईकांना बोलावलं आहे. ही महिला कुणाच्या आवाहनाने घराचा दरवाजा उघडते का, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. या प्रकरणी आता काय-काय घडामोडी घडतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, महिला मनोरुग्ण असल्याने गुन्हा दाखल करण्यात येणार नाही. महिलेची चौकशी करण्यात येईल. मात्र गुन्हा दाखल होणार नाही. आरोपी जर मनोरुग्ण असेल तर गुन्हा न दाखल करण्याच कायद्यात प्रावधान आहे.

संबंधित घटना ही काल सायंकाळी साडे सहा ते सात वाजेच्या सुमारास घडली. मुंबईत काल संध्याकाळी पाऊस पडत होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांची ड्युटी आटोपून घरी जाण्याची लगबग होती. पण याच वेळी या महिलेने मंत्रालयात धिंगाणा घातला. मंत्रालय हे सर्वात महत्त्वाचं ठिकाण आहे. असं असताना अशाप्रकारे एखादी महिला प्रवेश करुन धिंगाणा कशी घालू शकते? असा प्रश्न उपस्थित होतोय. या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका, भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव, वाचा A टू Z निकाल सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका, भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव, वाचा A टू Z निकाल
मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर येत आहे. ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. निवडणूक वारंवार...
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेची मुसंडी; 10 पैकी इतक्या जागांवर दणदणीत विजय
हे एखादे षडयंत्र तर नाही ना? देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड; चित्रा वाघ यांचा इशारा कुणाकडं?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, कोणी मारली बाजी?
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला करायचं सलमान खानशी लग्न? भाजप पदाधिकारीचा दावा
पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून अ‍ॅसिड फेकले
महाराष्ट्र महाराजांचा अपमान सहन करणार नाही! गाण्याच्या माध्यमातून फडणवीसांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी