Akshay Shinde : इथं अफजल खानचा मृतदेह दफन झाला; मग आमच्यासाठी ही टाळाटाळ का? अक्षय शिंदे याच्या वकिलांचा सरकारी यंत्रणावर संताप; महाराजांच्या शिकवणीची करून दिली आठवण

Akshay Shinde : इथं अफजल खानचा मृतदेह दफन झाला; मग आमच्यासाठी ही टाळाटाळ का? अक्षय शिंदे याच्या वकिलांचा सरकारी यंत्रणावर संताप; महाराजांच्या शिकवणीची करून दिली आठवण

बदलापूर येथील एका शाळेत दोन लहान मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा पोलीस एनकाऊंटरमध्ये मृत्यू झाला. या एनकाऊंटरवर राज्यात उलटसूलट चर्चा सुरू आहे. विरोधकांनीच नाही तर न्यायपालिकेने सुद्धा त्यावर प्रश्नचिन्ह उभं केले आहे. हा वाद सुरू असतानाच अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळत नसल्याची बाजू त्याचे वकील अमित कटारनवरे यांनी न्यायालयासमोर मांडली.

कोर्टासमोर मांडली कैफियत

कोर्टामध्ये आज आम्ही मृतदेह दफन करण्यासाठी साठी जागा मिळत नाही यासंदर्भात आम्ही मुद्दा मांडला. यावर कोर्टाने निकाल देताना सांगितलं की,लवकरत लवकर सरकारने मृतदेह दफन करण्यासंदर्भात काम करावं. पण सरकारी अधिकारी आहेत जे की मृतदेह ताब्यात घेण्यासाठी कुटुंबियांना सहकार्य करत नाहीत. साधी स्वाक्षरी देण्यासाठी पण अधिकाऱ्यांना वेळ नाही, अशी बाजू वकील अमित कटारनवरे यांनी मांडली.

महाराजांच्या शिकवणीची करुन दिली आठवण

छत्रपती शिवाजी महाराजांची आपल्यावर शिकवण आहे. जेव्हा अफजल खानचा वध झाला होता तेव्हा त्याचा मृतदेह सुद्धा विधिवत पद्धतीने दफन करण्यात आला. तेव्हा माँ जिजाऊ यांनी शिवबांना सांगितल की वैर अफजल खान याच्याशी होतं. तो आत्ता मेला आहे तर त्याचं शरीर कुत्रा आणि कोल्ह्याने खाल्लेल हे आपल्याला शोभणार नाही. त्यानंतर अफजल खान याचा मृतदेह हा दफन करण्यात आला. त्यामुळे जर आम्हाला टाळाटाळ होत असेल तर प्रत्येक व्यक्तीचा मृतदेहावर व्यवस्थित पद्धतीने अंतिम संस्कार झाले पाहिजे हा कायदा आहे तो आम्ही लागू करून घेऊ. पोस्को गुन्हा हा संसदेत पारित झाला ना मग त्यावर एखाद आरोपी ची सुनावणी ही लवकर झाली पाहिजे ना पण आपल्या इथे कोर्ट,न्यायाधीश यांची कामतरात आहे त्यासंदर्भात सरकार कधी विचार करणार आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला.

कोर्टाचे आदेश काय ?

पोलिसांनी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासंदर्भात जागा उपलब्ध करुन देणार, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले. सोमवारपर्यंत मृतदेह दफन करण्याची कारवाई करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. प्रकरणात आता सोमवारी सुनावणी होणार आहे. या दफनविधीच्या कारवाईची माहिती कोर्टात सादर करण्याचे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका, भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव, वाचा A टू Z निकाल सिनेट निवडणुकीत ठाकरे गटाचा दणका, भाजप खासदाराच्या बहिणीचा दारुण पराभव, वाचा A टू Z निकाल
मुंबई विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित सिनेट निवडणुकींचा निकाल आज अखेर समोर येत आहे. ही निवडणूक गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होती. निवडणूक वारंवार...
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेची मुसंडी; 10 पैकी इतक्या जागांवर दणदणीत विजय
हे एखादे षडयंत्र तर नाही ना? देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड; चित्रा वाघ यांचा इशारा कुणाकडं?
मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर, कोणी मारली बाजी?
देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करणाऱ्या महिलेला करायचं सलमान खानशी लग्न? भाजप पदाधिकारीचा दावा
पतीचे दुसऱ्या महिलेसोबत प्रेमसंबंध, पत्नीने घटस्फोट मागितला म्हणून अ‍ॅसिड फेकले
महाराष्ट्र महाराजांचा अपमान सहन करणार नाही! गाण्याच्या माध्यमातून फडणवीसांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी