Amit Shah : ‘मिशन मुंबई’! अमित शाह यांचं विशेष प्लॅनिंग, विधानसभेसाठी रणनिती काय ?

Amit Shah : ‘मिशन मुंबई’! अमित शाह यांचं विशेष प्लॅनिंग, विधानसभेसाठी रणनिती काय  ?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्तही मुंबईत आले असून कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा होऊ शकते. भाजपनेही निवणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली असून विदर्भ , मराठवाड्यानंतर आता भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाहांनी आता मिशन मुंबई ठरवत खास प्लानिंग केलं आहे. येत्या 1 किंवा 2 ऑक्टोबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांनी विधानसभेसाठी खास रणनिती आखली आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपला निर्भेळ यश मिळालं नाही. त्या निवडणुकीत दणका बसल्यानंतर आता भाजपने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी मात्र कंबर कसली असून अमित शाह वारंवार महाराष्ट्रात येताना दिसत आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने विदर्भ,मराठवाड्यासाठी खास रणनिती आखली. त्याचप्रमाणे आता मुंबईसाठी देखील स्पेशल मिशन असून मुंबईसाठी अमित शाहांनी खास प्लानिंग केलंय. मुंबईतील जे डेंजर झोनमधील मतदारसंघ आहेत त्याचा विभागनिहाय आढावा अमित शाह घेणार आहेत. एवढेच नव्हे तर ते मुंबईतील सर्व कार्यकर्त्यांशी स्वत: संवाद साधणार आहेत.

मुंबई भाजप अलर्ट मोडवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे मुंबई भाजप अलर्ट मोडवर गेला आहे. पुढच्या तीन दिवसांमध्ये मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघ पिंजून काढण्याचे आदेश भाजप पदाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या तीन दिवसांमध्ये मुंबईच्या प्रत्येक विधासभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तायर केला जाणार असून तो अमित शाह यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. या रिपोर्टनुसार, ज्यांची कामगिरी समाधानकारक नसेल त्यांचे टेन्शन वाढणार असून,त्यांच्याबद्दल अमित शाह काय भूमिका घेतात, त्यांना काय कानपिचक्या देतात याकडेही अनेकांचे लक्ष लागलं आहे.

विदर्भात मिशन 45 चं टार्गेट

विदर्भात अमित शाहांनी भाजपला मिशन 45 चं टार्गेट दिलं आहे. जी जागा विदर्भात भाजप गमावेल, ती जागा काँग्रेसच्या खात्यात जाईल. त्यामुळे छोटं लक्ष्य न ठेवता 45 चा नारा अमित शाहा यांनी दिला आहे.

महाराष्ट्रात विरोधकांची मुळं कमकुवत करा

महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मुळंच कमकुवत करा. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बुथ लेव्हलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा, असे आदेशही अमित शाह यांनी कोल्हापूरच्या
दौऱ्यात पदाधिकाऱ्यांना दिले. प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. त्याला आपल्याशी जोडून त्याच्या कौशल्याचा उपयोग करून घ्या, असं अमित शाह म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याने कार्यकर्ते थोडे उदास झाले होते, पण आता आळस झटकून कामाला लागा. निवडणुकीत जोमाने काम करा. आपली सत्ता कशी येईल याचा विचार करा, असा सल्लाही शाह यांनी कोल्हापुरात दिला होता.

लवकरच वाजणार विधानसभा निवडणुकीचं बिगूल

महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ.सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे मुंबईत आगमन झाले. 27 आणि 28 सप्टेंबर या दोन दिवसांत केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Devendra Fadnavis : मंत्रालयात महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न, VIDEO Devendra Fadnavis : मंत्रालयात महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न, VIDEO
महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे...
उर्वशी रौतेला हिने केली अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूरची मोठी पोलखोल, म्हणाली, डेटिंग ॲपवर फक्त…
चार लेकरांचा बाप आहे सैफ अली खान, दुसऱ्या लग्नानंतर अभिनेता कसा काढतो वेळ, मोठा खुलासा
लेकीसाठी मुंबईत पहिल्यांदाच ठेवलं पाऊल; ‘कोकण हार्टेड गर्ल’ला अश्रू अनावर
कॉर्डेलिया क्रूझवर लीला करणार एजेला प्रपोज; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा धमाकेदार एपिसोड
Bhool Bhulaiyaa 3: मोंजोलिका परततेय..; घाबरगुंडी उडवणारा ‘भुलभुलैय्या 3’चा टीझर पाहिलात का?
Pune: पोर्शे हिट अँड रन प्रकरणात नवीन खुलासा; रक्ताचे नमुने बदलण्यावेळची आणखी धक्कादायक माहिती आली समोर