IIM अहमदाबादमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर ट्रोल झाल्याने बिग बींच्या नातीच्या प्रतिक्रियेनं जिंकली मनं

IIM अहमदाबादमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर ट्रोल झाल्याने बिग बींच्या नातीच्या प्रतिक्रियेनं जिंकली मनं

बॉलिवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. स्टारकिड असूनही नव्या तिच्या साधेपणामुळे सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच तिने IIM अहमदाबादमध्ये प्रवेश मिळाल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियाद्वारे नेटकऱ्यांना सांगितली होती. मात्र यावरून काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं होतं. आता नुकत्याच एका कार्यक्रमात तिला या ट्रोलिंगविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर नव्याने अत्यंत विचारपूर्वक उत्तर दिलं आहे. सध्या तिच्या उत्तराचीच जोरदार चर्चा होत आहे.

नव्या म्हणाली, “सोशल मीडिया हे खूप ताकदीचं माध्यम आहे. जर त्याचा वापर योग्य पद्धतीने केला तर समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्याची खूप मोठी मदत होऊ शकते. आयआयएमसारख्या (IIM) अत्यंत प्रतिष्ठित संस्थेचा भाग बनण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वत:ला खूप भाग्यवान समजते. माझ्या ट्रोलिंगबद्दल बोलायचं झाल्यास, सोशल मीडियावर स्वत:बद्दल व्यक्त होण्याचा निर्णय माझाच होता. माझ्या कामाबद्दल मी तिथे व्यक्त होते. लोकांनाही त्यांची मतं मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे मी त्याविरोधात नाही आणि लोक जे म्हणतात, त्याचं मला वाईटही वाटत नाही.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Navya Naveli Nanda (@navyananda)

माझ्याबद्दल आणि माझ्या कामाबद्दल लोकांची जी प्रतिक्रिया आहे, ते स्वीकार करणं खूप महत्त्वाचं असल्याचंही ती म्हणाली. “माझ्याबद्दल आणि माझ्या कामाबद्दल लोक काय म्हणतायत हे पाहणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. यामुळे माझ्यात आणखी सुधारणा होईल आणि मी आणखी चांगली उद्योजिका, चांगली भारतीय बनू शकेन. माझ्या मते लोकांच्या फीडबॅककडे योग्य दृष्टीकोनातून पाहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे माझ्याबद्दल लोक जे काही म्हणतात, त्याबद्दल मी वाईट वाटून घेत नाही”, असंही तिने सांगितलं.

यावेळी नव्याने स्टारकिड असल्यामुळे तिला मिळत असलेल्या विशेष अधिकारांबद्दल कृतज्ञताही व्यक्त केली. “मी या गोष्टीचा स्वीकार करते की भारतातील बहुतांश लोकांपेक्षा एक वेगळं आयुष्य मी जगतेय. मला जन्मत:च काही विशेषाधिकार मिळाले आहेत. त्यामुळे कमी वयातच मला इतरांपेक्षा अधिक संधी मिळत आहेत. अर्थातच याबद्दल लोकांना काही बोलायचं असेल. मी खुल्या मनाने याचा विचार करण्याची खूप गरज आहे. लोकांच्या प्रतिक्रियांचा मी सकारात्मकपणे विचार केला तर माझ्यात आणि माझ्या कामात चांगले बदल घडू शकतील. त्यामुळे लोक नकारात्मकतेने काही बोलत असतील तरी त्याबद्दल फार विचार न करता स्वत:त काय बदल घडवता येतील हे मी पाहीन”, असं नव्या पुढे म्हणाली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Devendra Fadnavis : मंत्रालयात महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न, VIDEO Devendra Fadnavis : मंत्रालयात महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न, VIDEO
महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे...
उर्वशी रौतेला हिने केली अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूरची मोठी पोलखोल, म्हणाली, डेटिंग ॲपवर फक्त…
चार लेकरांचा बाप आहे सैफ अली खान, दुसऱ्या लग्नानंतर अभिनेता कसा काढतो वेळ, मोठा खुलासा
लेकीसाठी मुंबईत पहिल्यांदाच ठेवलं पाऊल; ‘कोकण हार्टेड गर्ल’ला अश्रू अनावर
कॉर्डेलिया क्रूझवर लीला करणार एजेला प्रपोज; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा धमाकेदार एपिसोड
Bhool Bhulaiyaa 3: मोंजोलिका परततेय..; घाबरगुंडी उडवणारा ‘भुलभुलैय्या 3’चा टीझर पाहिलात का?
Pune: पोर्शे हिट अँड रन प्रकरणात नवीन खुलासा; रक्ताचे नमुने बदलण्यावेळची आणखी धक्कादायक माहिती आली समोर