गरवारे मेट्रो स्टेशनला गळती

गरवारे मेट्रो स्टेशनला गळती

अर्धवट आणि घाईघाईने गेल्यावर्षी वनाज ते रुबी हॉल क्लिनिकदरम्यान मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले होते. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे गरवारे महाविद्यालय मेट्रो स्टेशनला गळती लागली आहे. त्यामुळे प्रवासी पाय घसरून पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यामुळे भाजपच्या निकृष्ट आणि दर्जाहीन कामाचे पितळ उघडे पडले आहे.

मेट्रो मार्गाच्या पुढच्या टप्यातील जिल्हा न्यायालय ते स्वारगेट भुयारी मार्गाचे उ‌द्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात येणार होते. परंतु, पावसामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आला. आताही अनेक ठिकाणी मेट्रो स्टेशनचे काम अर्धवट आहे. तरीही निवडणुकीच्या तोंडावर अर्धवट कामाचे उ‌द्घाटन करण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. परंतु, याचा मनस्ताप नागरिकांना सहन करावा लागत आहे. सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट भुयारी मार्गाच्या दरम्यान असणाऱ्या मेट्रो स्टेशनचे काम अजून अर्धवट आहे, तरीही उद्घाटन करण्याची घाई भाजप करीत आहे. यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने भाजपच्या कार्यपद्धतीवर टीका होत आहे.

गेल्यावर्षी जेव्हा वनाज ते रुबी हॉल क्लिनिकदरम्यान मेट्रो मार्गाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळीसुद्धा अनेक ठिकाणी कामे अर्धवट होती. त्याचा परिणाम एका वर्षात नागरिकांना भोगावा लागत आहे. कोट्यवधी रुपये खर्च करून अशाप्रकारे निकृष्ट कामे होत असली तरी भाजप मात्र स्वतःचा डांगोरा पिटत आहे. गळक्या मेट्रो स्टेशनमुळे प्रवाशांना ये- जा करताना काही अघटित घटना घडली तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Devendra Fadnavis : मंत्रालयात महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न, VIDEO Devendra Fadnavis : मंत्रालयात महिलेकडून देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाच्या तोडफोडीचा प्रयत्न, VIDEO
महाराष्ट्रातील भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न झाला आहे. मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राज्याचे...
उर्वशी रौतेला हिने केली अर्जुन कपूर आणि आदित्य रॉय कपूरची मोठी पोलखोल, म्हणाली, डेटिंग ॲपवर फक्त…
चार लेकरांचा बाप आहे सैफ अली खान, दुसऱ्या लग्नानंतर अभिनेता कसा काढतो वेळ, मोठा खुलासा
लेकीसाठी मुंबईत पहिल्यांदाच ठेवलं पाऊल; ‘कोकण हार्टेड गर्ल’ला अश्रू अनावर
कॉर्डेलिया क्रूझवर लीला करणार एजेला प्रपोज; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेचा धमाकेदार एपिसोड
Bhool Bhulaiyaa 3: मोंजोलिका परततेय..; घाबरगुंडी उडवणारा ‘भुलभुलैय्या 3’चा टीझर पाहिलात का?
Pune: पोर्शे हिट अँड रन प्रकरणात नवीन खुलासा; रक्ताचे नमुने बदलण्यावेळची आणखी धक्कादायक माहिती आली समोर