हवामान खात्याच्या रेड अलर्टला हुलकावणी, दिवसभर पावसाची नुसती हुलाहूल

हवामान खात्याच्या रेड अलर्टला हुलकावणी, दिवसभर पावसाची नुसती हुलाहूल

मुंबईत बुधवारी सायंकाळपासून रात्रीपर्यंत अक्षरशः धुमापूळ घालून नागरिकांना वेठीस धरणाऱया पावसाने रात्री उशिरा एक्झिट घेत हवामान खात्याच्या रेड अलर्टला हुलकावणी दिली. मुंबई शहरात सकाळपासून पाऊस झाला नाही तर पूर्व उपनगरात तुरळक तर पश्चिम उपनगरात बोरिवली-दहिसरमध्ये काही जोरदार सरी बरसल्या. पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईतील रेल्वे आणि रस्ते वाहतूकही सुरळीत राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले नाही.

मुंबईत गेल्या महिनाभरापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी सायंकाळी अचानक जोरदार बरसायला सुरुवात केल्याने जनजीवन विस्कळीत झाले. यातच मुंबईसह ठाणे, रायगड आणि कोकणपट्टीला हवामान खात्याकडून गुरुवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आल्याने सर्वांना काळजी लागून राहिली होती. मुंबई महानगरपालिकेनेही रात्री उशिरा मुंबईतील सर्व शाळा-का@लेजना सुट्टी जाहीर केली. मात्र रात्री उशिरा एक्झिट घेतलेला पाऊत दिवसभर परतलाच नाही. पश्चिम उपनगरातील काही भाग सोडता अत्यंत तुरळक पाऊस झाला. यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला असला तरी हवामान खात्याच्या रेड अलर्टला मात्र पावसाने हुलकावणी दिली.

बरे झाले हवामान खात्याने रेड अलर्ट दिला, नाहीतर पाऊस थांबलाच नसता!

जुलै महिन्यातही जोरदार पाऊस सुरू असताना हवामान खात्यानेही मुंबई आणि परिसराला खबरदारीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला होता. यानंतर पालिकेनेही मुंबईतील शाळा-का@लेजना सुट्टी जाहीर केली. मात्र हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी करताच पावसाने विश्रांती घेतली. आजही तोच प्रकार घडला. त्यामुळे ‘बरे झाले हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला, नाहीतर पाऊस थांबलाच नसता’ असे मिम्स सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले.

बुधवारच्या पावसात घरे, झाडे कोसळली; तीन जखमी

बुधवारी 24 तासांत झालेल्या जोरदार पावसामुळे मुंबईत 14 ठिकाणी झाडे-फांद्या कोसळल्याची घटना घडली. तर 21 ठिकाणी शॉर्टसर्पिटच्या घटना घडल्या. तर दहा ठिकाणी घर आणि घराचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. यामध्ये भांडुप पश्चिम पाईप लाइन रोड, गायत्री विद्यामंदिर रोडजवळील चाळीतील घराच्या भिंतीचा भाग कोसळून चार जण अडकले. यामध्ये दोन पुरुष आणि एक महिला जखमी झाली. जखमी झालेल्या तिघांमधील दोघांना उपचार करून घरी सोडण्यात आले, तर एका पुरुषावर उपचार सुरू असून त्यांची प्रपृती स्थिर असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडून देण्यात आली.

मिंध्यांकडील खात्याच्या बेपर्वाईचा बळी, अंधेरीत गटारात पडून महिला वाहून गेली

मुंबईत बुधवारी झालेल्या मुसळधार पावसात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्ताप झाला असताना मिंध्यांच्या अखत्यारीत असणाऱया नगरविकास खात्याच्या दुर्लक्षामुळे अंधेरीत गटारात पडून विमल आप्पाशा गायकवाड या महिलेचा मृत्यू झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. या ठिकाणी सुरू असलेल्या मेट्रोच्या कामाजवळील उघडी पर्जन्यजलवाहिनी बंद करण्यासाठी पालिकेने 11 जुलै रोजीच मेट्रो-3 ला पत्र दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अतिवृष्टीत सदर महिलेचा गटारात पडून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

मुंबईत बुधवारी सायंकाळी परतीचा जोरदार पाऊस झाला. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी तुंबले. रेल्वे वाहतूकही रखडली. त्यामुळे कामावरून घरी जाणाऱया मुंबईकरांचे प्रचंड हाल झाले. यातच रात्रीच्या सुमारास अंधेरीच्या सीप्झ परिसरात एका महिलेचा पर्जन्य जलवाहिनीमध्ये पडून मृत्यू झाला. या महिलेचे नाव विमल आप्पाशा गायकवाड असे आहे. पवईच्या मिलिंद नगरमध्ये वास्तव्याला असलेल्या विमल गायकवाड या बुधवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास सीप्झ परिसरातील कंपनीतून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्या वेळी जोरदार पाऊस सुरू होता. सीप्झच्या गेट क्रमांक 3 च्या परिसरात रस्त्यावर पाणी साचले होते. सीप्झ परिसरात अलीकडेच मेट्रो-3 मार्गावरील भुयारी स्थानक उभारण्यात आले आहे. एमएमआरडीएकडून या स्थानकाचे काम करण्यात आले होते. या वेळी येथील रस्त्यावरील एक ड्रेनेज लाईन उघडण्यात आली होती. स्थानकाचे काम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीएने ड्रेनेज लाईनवर झाकण टाकून ती बंद केली नाही. त्यामुळे विमल गायकवाड चालताना ड्रेनेजमध्ये पडल्या. त्या ड्रेनेजमध्ये पडल्यानंतर वाहत गेल्या, त्यांना सावरण्यासाठी उसंतही मिळाली नाही. ही घटना लक्षात येताच स्थानिकांनी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण केले, मात्र या दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला.

अग्निशमन दलाचे प्रयत्न व्यर्थ

विमल या गटारात पडल्याचे निदर्शनास आलेल्या नागरिकांनी अग्निशमन दलाला याची माहिती दिली. या वेळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य सुरू केले. मात्र या सगळय़ात तासभराचा वेळ निघून गेला. अग्निशमन दलाच्या जवानांनी ड्रेनेजमध्ये शोधाशोध केल्यानंतर साधारण 90 मीटर अंतरावर विमल गायकवाड यांचा मृतदेह सापडला. त्यांना तातडीने कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.

पालिकेकडून उच्चस्तरीय चौकशी समिती

अंधेरी पूर्वमधील सीप्झ परिसरात पर्जन्य जलवाहिनीत पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी केली आहे. तीन सदस्यांचा समावेश असलेल्या या समितीला येत्या तीन दिवसांत आपला अहवाल सादर करावा लागणार आहे. या उच्चस्तरीय चौकशी समितीचे अध्यक्ष म्हणून परिमंडळ-3 चे उप आयुक्त देविदास क्षीरसागर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर आणि प्रमुख अभियंता (दक्षता) अविनाश तांबेवाघ हे समितीचे सदस्य आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Amit Shah : ‘मिशन मुंबई’! अमित शाह यांचं विशेष प्लॅनिंग, विधानसभेसाठी रणनिती काय  ? Amit Shah : ‘मिशन मुंबई’! अमित शाह यांचं विशेष प्लॅनिंग, विधानसभेसाठी रणनिती काय ?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याचदरम्यान विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य...
IIM अहमदाबादमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर ट्रोल झाल्याने बिग बींच्या नातीच्या प्रतिक्रियेनं जिंकली मनं
‘धर्मवीर 2’वरून संजय राऊतांची सरकारवर खरमरीत टीका; म्हणाले..
हातात रिवॉल्वर घेऊन पोस्टर लावले म्हणून कुणी ‘अभिमन्यू’ होत नाही, संजय राऊत यांचा फडणवीसांना टोला
IPL 2025 – KKR संघाला मिळाला गौतम गंभीरचा वारसदार, धोनीच्या हुकुमी एक्क्याकडे सोपवला कारभार
डीआरडीओची जवानांना दिवाळीआधीच मोठी भेट, आयआयटी दिल्लीने तयार केले बुलेटप्रूफ जॅकेट
औरंगजेबाप्रमाणे अमित शहांनी महाराष्ट्रात तंबू ठोकले तरी भाजप-महायुतीचा विजय होणार नाही! – संजय राऊत