बहिणींची अब्रु वाचण्याच्या शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, 100 टक्के….

बहिणींची अब्रु वाचण्याच्या शरद पवारांच्या विधानाला अजितदादांचं उत्तर; म्हणाले, 100 टक्के….

1 हजार 500 रुपये देण्यापेक्षा सरकारने बहिणींची अब्रु वाचवावी, असं म्हणत शरद पवार यांनी शिंदे सरकाराच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली. पवारांच्या या टीकेला आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे. शंभर टक्के महिलांचे अब्रू वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कायदा सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न प्रत्येक सरकार करतोय त्याप्रमाणे आम्ही देखील करतोय. लाडकी बहीण योजना ग्रामीण भागात जास्त पॉप्युलर झालेली दिसते, असं अजित पवार म्हणाले.अजित पवार आज मुंबईत आहेत. त्यांनी लालबागचा राजा आणि सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं. यावेळी ते बोलत होते.

महिला अत्याचाराच्या घटनांवर अजित पवार काय म्हणाले?

एका महिलेने काही दिवसापूर्वी सांगितलं गँगरेप झाला, मात्र तपासाअंती समोर आलं की तसं काही झालं नव्हतं. मात्र अशावेळी पोलिसांची संस्थेची बारामतीची बदनामी झाली, त्यामुळे अशा घटना घडता कामा नये. तक्रार आल्यानंतर एसपी आणि संबंधित हे सगळ्या प्रशासनांना ताकद लावली. माझ्या सगळ्या नावाने कारण नसताना कोणालाही गोवण्याचा प्रयत्न करू नये, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार लालबागचा राजाच्या चरणी

लालबागचा राजाचं दर्शन घेतल्यानंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा एक दिवस पुण्याला गेलो होतो एक दिवस बारामतीला दर्शनासाठी गेलो होतो. आज मुंबईत लालबागचा राजा, चिंतामणी आणि सिद्धिविनायक दर्शन घ्यायला आलो आहे. माझा नेहमी कटाक्ष असतो गर्दीच्या वेळेला आपल्या दर्शनामुळे लोकांना त्रास नको. आज वर्किंग डे असल्यामुळे जास्त गर्दी नाहीये. बापाकडे काही मागितलं नाही. राज्यात सुख समाधान शांती भरभराट सर्वांची होऊ दे… प्रत्येकाची भावना असते सर्वांचं भले होऊ दे, असं साकडं बाप्पाकडे घातल्याचं अजित पवारांनी सांगितलं.

राज्यात विधानसभा निवडणूक कधी?

राज्यात विधानसभेची निवडणूक कधी लागणार? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. तेव्हा मला काहीच माहिती नाही. निवडणूक आयोग ज्या वेळेला निवडणुका लावतील त्यावेळेला निवडणुका असतील. तो निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. किती टप्प्यात घ्यावं हा देखील त्यांचा अधिकार आहे. निवडणूक आयोग ठरवेल तेव्हा निवडणूक होईल, असं अजित पवार म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल
जनता ही वाघनखं आहेत आणि ही वाघनखं तुमच्या राजकारणाचा कोथळा बाहेर काढणार असे विधान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव...
लोकांची हसती-खेळती घरं उद्ध्वस्त केली; भाजपच्या ‘बुलडोझर राजवर’ अखिलेश यादव यांचा हल्लाबोल
हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही
Photo – सईचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवर चाहते फिदा
दिवाळीपूर्वी BCCI चे खेळाडूंना गिफ्ट; बंगळुरूमध्ये National Cricket Acadamy चे उद्घाटन, नावातही केला बदलं
Ratnagiri News – वर्दळीच्या हर्णे मार्गावर खड्डयांचे साम्राज्य; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष
ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले…