Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : ‘1500 नको, आधी बहिणींची अब्रू वाचवा’, श्रेयवादावरुन ठाकरे, पवारांनी महायुतीला धरलं धारेवर, पाहा व्हिडीओ

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : ‘1500 नको, आधी बहिणींची अब्रू वाचवा’, श्रेयवादावरुन ठाकरे, पवारांनी महायुतीला धरलं धारेवर, पाहा व्हिडीओ

लाडकी बहीण योजनेवरुन सुरु झालेलं राजकारण थांबण्याचं नाव घेत नाहीये. लाडकी बहीण योजनेवरुन शरद पवारांनी
पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलंय. पंधराशे रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवणं आणि संरक्षण देणं जास्त महत्त्वाचं असल्याचं म्हणत पवारांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केलाय.

पंधराशे रुपयांपेक्षा बहिणींची अब्रू वाचवणे आणि संरक्षणाची गरज. फक्त शरद पवारच नव्हे शिर्डीतून उद्धव ठाकरेंनी
देखील लाडकी बहीण योजनेवरुन सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तसंच लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत सुरु असलेल्या श्रेयवादावरुन देखील उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागलंय. जनतेचा पैसा खाऊ आणि मीच तुझा भाऊ असं महायुतीत सुरु, दरम्यान उद्धव ठाकरेंच्या टीकेचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीत सुरु असेलली श्रेयवादाची लढाई. कधी दादांच्या जाहिरातीत मुख्यमंत्र्यांचं नाव नाही. तर कधी भाजप-शिंदेंच्या कार्यकर्त्यांच्या बॅनरवर अजितदादांचा फोटो नव्हता.

पाहा व्हिडीओ:-

मुख्यमंत्री शब्द वगळला आणि फक्त माझी लाडकी बहीण शब्द वापरला. बारामतीत देवाभाऊ म्हणून बॅनर लागले त्यावर आक्षेप घेतला नाही. लाडकी बहीण योजनेवरुन मागील काही दिवसांपासून राजकारण सुरु आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बहिणींची आठवण आल्याची टीका विरोधकांनी केलीय. दरम्यान विरोधकांच्या टीकेला सत्ताधाऱ्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे…,’ काय म्हणाले संजय शिरसाट ‘दिघे साहेब किंग होतायत याची खुन्नस काहींना होती त्यामूळे…,’ काय म्हणाले संजय शिरसाट
आनंद दिघे यांच्या जीवनावरील धर्मवीर – 2 हा चित्रपट नुकताच रिलीज झाला आहे. या चित्रपटाला विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित केले...
तो येतोय… कुणाचे बॅनर्स?, अचानक शेकडो बॅनर्स लागल्याने नवी मुंबईत चर्चांना उधाण
बेपत्ता एमसी स्टॅन?, थेट विविध शहरात लावण्यात आले पोस्टर्स, मुंबईमधून बेपत्ता झाला आणि…
IIFA Awards 2024 मध्ये जान्हवी कपूरने गळ्यात घातलेल्या नेकलेसची किंमत वाचून विस्फारतील डोळे
लग्नाच्या 10 महिन्यांतच घटस्फोट; सध्या काय करते करण सिंह ग्रोवरची पूर्व पत्नी?
शिवसेना आमदार नितीन देशमुख यांच्या मुलावर अकोल्यात हल्ला, तिघांना अटक
जम्मू-काश्मीरमधील कठुआमध्ये चकमक, एक दहशतवादी ठार तर एक जवान शहीद