Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : अरविंद केजरीवालांचं राजीनामास्त्र, पुढचा मुख्यमंत्री कोण?

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : अरविंद केजरीवालांचं राजीनामास्त्र, पुढचा मुख्यमंत्री कोण?

तुरुंगांतून जामिनावर बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी एक मोठी घोषणा केलीय. दोन दिवसानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा अरविंद केजरीवालांनी कार्यकर्त्यांसमोर केलीय. दरम्यान अरविंद केजरीवालांनी केलील घोषणा म्हणजे स्टंटबाजी असल्याचं म्हणत भाजपनं पलटवार केलाय. महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या देखील निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी देखील अरविंद केजरीवाल यांनी केलीय. तसंच निवडणुका होईपर्यंत आपचा दुसरा नेता मुख्यमंत्रिदाच्या खूर्चीवर बसणार असल्याचंही केजरीवालांनी म्हटलंय.

अरविंद केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर आपमधून कोणाची नावं मुख्यंत्रिदासाठी चर्चेत आहे. त्यामध्ये गोपाल राय हे आम आदमी पार्टीचे संयोजक आहेत. केजरीवालांच्या अनुपस्थितीत ते पक्ष संघटनेचं कामकाज पाहतात. आतिशी मार्लेना दिल्लीच्या सार्वजनिक बांधकाम व शिक्षणमंत्री म्हणून काम पाहत आहेत. कैलाश गहलोत यांच्याकडे एकूण आठ खाती आहेत. यामध्ये कायदा, न्याय व विधीमंडळ व्यवहार, वाहतूक, प्रशासकीय सुधारणा, माहिती व तंत्रज्ञान, महसूल, वित्त आणि नियोजन या खात्यांचा समावेश आहे. सौरभ भारद्वाज यांच्याकडे सध्या दक्षता, सेवा, आरोग्य, उद्योग, शहरी विकास आणि पूर नियंत्रण आणि पाणी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे. इम्रान हुसैन यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाचा कारभार आहे.

पाहा व्हिडीओ:-

अरविंद केजरीवालांनी महाराष्ट्रासोबत दिल्लीच्या निवडणुका घेण्याची मागणी केलीय. मात्र, 2020च्या दिल्लीच्या निवडणुकीतलं नेमकं गणित काय होतं. 2020च्या विधानसभेत आपनं एकहाती सत्ता मिळवली. आम आदमी पक्षाला दिल्लीत 62 जागांवर दणदणीत यश मिळालं. तर भाजपला केवळ 8 जागा जिंकता आल्यात तर काँग्रेसला खातं देखील खोलता आलं नव्हतं.

2024मध्ये आपची स्थिती बघितली तर आपला 2 आमदारांना सोडचिठ्ठी दिली. त्यातील एका आमदारानं भाजपात पक्षप्रवेश केला तर दुसऱ्या आमदारानं काँग्रेसला हात धरलाय. त्यामुळे आपकडे सध्या 62मधून केवळ 60 आमदार उरले आहेत. अरविंद केजरीवाल दोन दिवसानंतर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार आहेत.. त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? तसंच महाराष्ट्राबरोबर निवडणुका घेण्याची केजरीवालांची मागणी पूर्ण होणार का? ते पाहावं लागणारय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

“ही माझी आई आहे..”; दिलजीत दोसांझने 15 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा दाखवला आईचा चेहरा “ही माझी आई आहे..”; दिलजीत दोसांझने 15 वर्षांच्या करिअरमध्ये पहिल्यांदा दाखवला आईचा चेहरा
दिलजीत दोसांझ हे नाव आता फक्त पंजाबी गाण्यांच्या चाहत्यांपुरतंच मर्यादित राहिलेलं नाही. टेलर स्विफ्ट, कोल्डप्ले, एड शिरीन, बीटीएस यांसारख्या आंतरराष्ट्रीय...
‘बिग बॉस मराठी’ फेम इरिना रूडाकोवा झळकणार मराठी मालिकेत
घटस्फोटानंतर परत प्रेमात पडला हनी सिंह?, गर्लफ्रेंडच्या हातामध्ये हात टाकून…
IIFA 2024: वयाच्या 69 व्या वर्षी रेखा यांचा भन्नाट डान्स, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील भाव, दिलखेच अदा आणि…
डिप्रेशनमध्ये अनेक वर्ष, आईनेच केला सांभाळ, अखेर अभिनेत्रीने ‘तो’ खुलासा करत…
‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम अभिनेता दिवाळखोरीत; शेतीची वाट धरून ‘शार्क टँक इंडिया’मध्ये दिलं ऑडिशन पण..
Deepika Padukone हिच्या लेकीच्या प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर, अभिनेत्रीची आई म्हणाली…