अमिताभ किचनमध्ये काय बनवतो? केबीसीमध्ये प्रथमच सांगितले ते ‘राज’

अमिताभ किचनमध्ये काय बनवतो? केबीसीमध्ये प्रथमच सांगितले ते ‘राज’

बॉलीवूडचे बादशाह दिग्गज बिग बी अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोड़पति’ च्या 16 व्या सीजनमधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. प्रत्येक भागात सहभागी झालेल्या स्पर्धकाबरोबर त्यांचा संवाद चांगलाच रंगलेला असतो. कधी स्पर्धकांच्या जीवनातील अनुभवाने अमिताभ बच्चन प्रभावित होताना दिसतात. कधी, कधी बिनधास्त असलेले स्पर्धक अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारुन त्यांचे राज काढतात. कधी स्वत:हून अमिताभ बच्चन आपली माहिती शेअर करतात. नुकतेच आदिवासींसाठी मोठे कार्य करणारे पद्मश्री डॉ. अभय बंग आणि त्यांच्या पत्नी डॉ. राणी बंग अमिताभ बच्चन यांच्या सोबत केबीसीच्या हॉट सीटवर बसले होते.

केबीसीमध्ये 13 सप्टेंबर रोजी डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग स्पेशल गेस्ट म्हणून सहभागी झाले होते. यावेळी या दोघांनी केलेल्या कार्याची माहिती देणारा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यावेळी शिक्षणासाठी अमेरिकेला न जाता ग्रामीण सेवेसाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या वडिलांची आठवण आल्याने डॉ. अभय बंग भावूक झाले.

मग अमिताभ बच्चन म्हणाले…

डॉ.राणी बंग यांनी सांगितले की, रुग्णालय बांधताना स्थानिक लोकांची गरजा लक्षात घेऊन ते काम पूर्ण करण्यात आले. त्यावेळी वातावरण गंभीर झाले होते. मग वातावरण हलके करण्यासाठी बिग बी यांनी डॉक्टर अभय बंग यांना त्याच्या आवडत्या खाद्यपदार्थांबद्दल विचारले. अभय बंग यांनी पत्नी राणीकडून बनवण्यात येणाऱ्या मसाला डोसाविषयीही सांगितले. त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले, ‘आम्हालाही मसाला डोसा खूप आवडतो.’ राणी यांनी गमतीने सांगितले की, मी अभय यांच्यासाठी सर्व काही बनवते, पण ते फक्त माझ्यासाठी चहाच बनवतात. त्यामुळे प्रेक्षक चांगलेच हसले. मग अभय बंग म्हणाले, माझे किचनमधील स्किल केवळ चहा बनवण्यापुरते मर्यादीत आहेत. त्यानंतर अमिताभ बच्चन म्हणाले, तुम्हाला चहा तरी बनवता येतो. माझे किचनमधील स्कील फक्त गरम पाणी करण्यापर्यंत आहे. त्यापेक्षा इतर काहीच मला बनवता येत नाही.

दोघांची पहिली भेट…

डॉ अभय बंग आणि राणी बंग हे त्यांच्या पहिल्या भेटीबद्दलही केबीसीमध्ये बोलले. या दोघांची पहिली भेट मेडिकल कॉलेजमध्ये झाली. डॉ.अभय यांच्या एका मित्राने त्याला राणीबद्दल सांगितले होते. या दोघांनी मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस ते एमडी नऊ वर्षे एकत्र शिक्षण घेतले होते. राणी यांच्या वागणुकीमुळे डॉ अभय त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. जेव्हा अभय यांनी त्याला प्रपोज केले, तेव्हा राणी यांनी समजले ते हुशार तर आहेच परंतु सुंदर देखील आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्रीच…शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी मुख्यमंत्रीच…शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा गौप्यस्फोट
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा आंधारे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. त्याचवेळी महायुतीमध्ये एकमेकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा...
महायुती सरकार महाराष्ट्राचा 7/12 अदानीच्या नावे लिहिणार का? विजय वडेट्टीवार यांचा संताप, सरकारवर घणाघात
नेपाळमध्ये पावसाचा हाहाकार, 112 ठार; कोसीची पाणीपातळी वाढल्याने बिहारही जलमय, 56 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी लावलेले आयईडी डिफ्युज करताना स्फोट , CRPF चे पाच जवान जखमी
महाराष्ट्र विक्री आहे! जमीन, उद्योगानंतर आता शाळाही अदानीच्या ताब्यात; अंबादास दानवेंचा मिंधे सरकारवर हल्लाबोल
‘हेलेन’चा अमेरिकेत तर मॅक्सिकोमध्ये ‘जॉन’ चक्रीवादळाचा धुमाकूळ, 50 हून अधिक लोकांचा मृत्यू
लाडकी बहीण योजनेचा भार… ‘या’ कर्मचाऱ्यांना पगारही नाही मिळणार; संजय राऊत यांच्या दाव्याने खळबळ