Nagar News – श्री विशाल गणेश मंदिराचा परिसर महिलांच्या सामुहिक अथर्वशीर्ष पठणाने दुमदुमला

Nagar News – श्री विशाल गणेश मंदिराचा परिसर महिलांच्या सामुहिक अथर्वशीर्ष पठणाने दुमदुमला

नगर-शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर येथे गणेशोत्सवानिमित्त सामुहिक अथर्वशीर्ष पठण व महाआरती करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर विणा दिघे, अमृता बेडेकर, निनाद ढोरे, ज्योती विधाते, प्रज्ञा मुनोत, सई भुजबळ, शरयु लोंढे, स्नेहन धर्माधिकारी, रोहिणी थोरात आदिंनी अथर्वशीर्ष पठणास प्रारंभ केला. यावेळी रेखा झंवर व त्यांच्या सहकारी महिलांनी शंखनाद केला.

या अथर्वशीर्ष मध्ये असंख्य महिला सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक वेशभुषा, एक ताल-सुरात अथर्वशीर्षने परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रातिनिधीक स्वरुपात महिलांचा सन्मान केला, त्यानंतर महाआरती करुन प्रसाद वाटपाने सांगता झाली.

या अथर्वशीर्ष साठी नितीन पुंड, आण्णा चौधरी, गणेश आंबेकर, राजू जग्गी, राजेश एकाडे, गणेश पालवे, वैभव जगताप, सुधीर सुळ, प्रणित अनमल, सुहास दुर्गे, विनायक कानडे, बाळासाहेब व्यापारी, किशोर सुडके, मिलिंद कानडे, संदिप फुलसौंदर, संदिप बेरड, प्रदिप झोडगे आदिंनी सहकार्य केले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, विश्‍वस्त पांडूरंग नन्नवरे, विजय कोथिंबीरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, गजानन ससाणे, माणिकराव विधाते, संजय चाफे, नितिन पुंड आदिंसह पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विना दिघे यांनी केले. तर आभार अ‍ॅड.अभय आगरकर यांनी मानले. तसेच या कार्यक्रमास तबल्याची साथसंगत विकास साबळे यांनी दिली. तर साऊंड सिस्टीमची व्यवस्था रोहन ढोरे यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सोशल मीडियावर मुलींच्या नावे खोटे अकाऊंट बनवायचे, मग ब्लॅकमेल करून लुटायचे सोशल मीडियावर मुलींच्या नावे खोटे अकाऊंट बनवायचे, मग ब्लॅकमेल करून लुटायचे
सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सायबर गुन्हेगारी गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डॉक्टर, वकील आणि पोलिसही या सायबर...
योजनांचा पाऊस, वित्तविभागाला घाम?, वाचा ‘टीव्ही 9 मराठी’चा स्पेशल रिपोर्ट!
भ्रष्टाचारी गुंडांना पक्षात प्रवेश, हीच तुमच्या भाजपची संकल्पना आहे का? नागपुरात उद्धव ठाकरे यांचा मोहन भागवत यांना सवाल
लोकांची हसती-खेळती घरं उद्ध्वस्त केली; भाजपच्या ‘बुलडोझर राजवर’ अखिलेश यादव यांचा हल्लाबोल
हसन नसरल्लाह याचा मृतदेह सापडला, शरीरावर घाव नाही
Photo – सईचा हॉट लूक सोशल मीडियावर चर्चेत, फोटोंवर चाहते फिदा
दिवाळीपूर्वी BCCI चे खेळाडूंना गिफ्ट; बंगळुरूमध्ये National Cricket Acadamy चे उद्घाटन, नावातही केला बदलं